Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती संघाला सर्वसाधारण अजिंक्यपद

Date:

तब्बल १६ सूवर्ण तर २० रौप्यपदकांची केली कमाई

पुणे, दि. ५ फेब्रुवारी २०२३: छत्रपती संभाजीनगर येथे आयोजितमहावितरणच्या २०२३-२४च्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत सलग दुसऱ्या वर्षी सर्वसाधारण अजिंक्यपदाचा मान पटकावला. तर कोल्हापूर परिमंडलाने उपविजेतेपद मिळविले. पुणे-बारामती परिमंडल संघातील खेळाडूंनी वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारात नेत्रदिपक कामगिरी करीत या स्पर्धेत तब्बल १६ सूवर्ण तर २० रौप्यपदकांची कमाई केली.

छत्रपती संभाजीनगर येथे दि. १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचा पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अशोका सभागृहात रविवारी (दि. ४) सायंकाळी समारोप झाला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. डॉ. भागवत कराड, संचालक (मानव संसाधन) श्री. अरविंद भादीकर, पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे, मुख्य अभियंता श्री. परेश भागवत, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व सहकाऱ्यांनी अजिंक्यपदाचा करंडक स्वीकारला.

महावितरणच्या १६ परिमंडलांच्या ८ संयुक्त संघातील सुमारे १२०० खेळाडूंचा समावेश असलेल्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार (पुणे) व श्री. सुनील पावडे (बारामती) यांच्या नेतृत्वात पुणे-बारामती परिमंडल संघाने यंदा क्रीडा स्पर्धेसाठी कसून तयारी करण्यात आली. खेळाडूंना प्रशिक्षण देणे, सराव शिबिर आदींचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडास्पर्धेचे समन्वयक तसेच उपमुख्य औद्योगिक अधिकारी श्री. शिरीष काटकर (पुणे) व श्री. श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) यांनी खेळाडूंची निवड चाचणी, सराव, प्रशिक्षण शिबिर आदींसाठी महत्वाचे योगदान दिले.

पुणे-बारामती परिमंडल संघाने सांघिक खेळात व्हॉलिबॉल, खोखो (पुरुष) व टेनिक्वाईट (महिला) स्पर्धेत विजेतेपद मिळविले तर कबड्डी (महिला), टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम (पुरुष) आणि बॅटमिंटन (महिला)  मध्ये उपविजेता ठरले. वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये पुणे-बारामती संघाचे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे- धावणे १०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (उपविजेता), २०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (विजेता), २०० मीटर (महिला)- माया येलवंडे (उपविजेता), ४०० मीटर (पुरुष)- गुलाबसिंग वसावे (विजेता), ४०० मीटर (महिला)- भक्ती लोमटे (उपविजेता), ८०० मीटर (पुरुष)- प्रतिक वाईकर (विजेता), १५०० मीटर (महिला)- अर्चना भोंग (उपविजेता), ५००० मीटर (पुरुष)- प्रतिक वाईकर (उपविजेता), ४ बाय १०० रिले (पुरुष) – गुलाबसिंग वसावे, प्रतिक वाईकर, अक्षय केंगळे, सोमनाथ कंठीकर (विजेते), गोळा फेक (पुरुष)- प्रवीण बोरावके (विजेता), थाळी फेक (पुरुष)- अक्षय केंगळे (उपविजेता), थाळी फेक (महिला)- हिना कुरणे (विजेता), भाला फेक (पुरुष)- अक्षय केंगळे (उपविजेता), लांब उडी- पुरुष गट- अक्षय केंगळे (उपविजेता), महिला गट- माया येळवंडे (उपविजेता), कॅरम (पुरुष)- संजय कांबळे (उपविजेता) टेनिक्वाईट– (महिला एकेरी)- अमृता गुरव (उपविजेता), (महिला दुहेरी)- शीतल नाईक, कोमल सुरवसे (विजेते), टेबल टेनिस– पुरुष एकेरी– अतुल दंडवते (विजेता), पुरुष दुहेरी- अतुल दंडवते व दीपर रोटे (विजेता), बॅडमिंटन- पुरुष एकेरी- भरत वशिष्ठ (विजेता), पुरुष दुहेरी – भरत वशिष्ठ व सुरेश जाधव (उपविजेता), महिला एकेरी- वैष्णवी गांगरकर (उपविजेता), महिला दुहेरी- वैष्णवी गांगरकर व कमल दारूखानवाला (उपविजेता), कुस्ती – ६५ किलो– राजकुमार काळे (विजेता), ७४ किलो- चंद्रकांत दरेकर (उपविजेता), ९२ किलो- अमोल गवळी (विजेता), ९७ किलो- महेश कोळी (विजेता).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...