Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्नने गौरवले जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा

Date:

ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारत रत्न ने गौरवले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या X वरच्या पोस्टद्वारे ही घोषणा केली.

पंतप्रधान मोदी यांनी लाल कृष्ण आडवाणी यांच्याशी बोलून, भारतरत्न सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.

पंतप्रधानांनी X  वर लिहिले केले आहे:

“मला हे सांगतांना अतिशय आनंद होत आहे की श्री लाल कृष्ण आडवाणी यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाला आहे. मी त्यांच्याशी बोललो आणि हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. आपल्या काळातील एक अत्यंत आदरणीय असे मुत्सद्दी राजकारणीअसलेल्या आडवाणी यांचे भारताच्या विकासातील योगदान अत्यंत महत्वाचे आहे. अगदी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात झाली आणि तो आलेख, देशाचे उपपंतप्रधान होण्यापर्यंत उंचावत गेला. गृहमंत्री आणि माहिती-प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली होती. संसदेतील चर्चेदरम्यान, त्यांचे वर्तन आणि त्यांची भाषणे, अनुकरणीय तसेच अत्यंत समृद्ध अशी दृष्टी देणारी होती.

सार्वजनिक जीवनातील कित्येक दशकांची त्यांची दीर्घ सेवा, पारदर्शकता आणि अढळ निष्ठा या मूल्यांप्रति समर्पित होती, त्यांच्या या जीवनकार्यातून त्यांनी पुढच्या पिढ्यांसाठी राजकीय नीतीमत्तेचा नवा आदर्श ठेवला. राष्ट्रीय एकतेची भावना वृद्धिंगत करण्यात तसेच, देशाच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत. त्यांना भारतरत्न प्रदान होणे, हा माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अनंत संधी मला मिळाल्यात,  हे मी नेहमीच माझे भाग्य समजतो “.

भाजपचे संस्थापक सदस्य, 7 वे उपपंतप्रधान होते
अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची येथे झाला. 2002 ते 2004 दरम्यान ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील 7 वे उपपंतप्रधान होते. याआधी ते 1998 ते 2004 दरम्यान एनडीए सरकारमध्ये गृहमंत्री होते. ते भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत.

अडवाणी यांना 2015 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता
2015 मध्ये, अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना हा सन्मान दिला होता.

त्यावेळी वाजपेयी 90 वर्षांचे होते आणि ते आजारी होते. प्रोटोकॉल सोडून मुखर्जी कृष्ण मेनन मार्गावरील माजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना भारतरत्न प्रदान केला. वाजपेयी यांच्याशिवाय यंदा मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर हा सन्मान देण्यात आला होता. 2019 मध्ये प्रणव मुखर्जी यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात आले होते.

• अडवाणींची राजकीय कारकीर्द 1942 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे स्वयंसेवक म्हणून सुरू झाली.

• अडवाणी 1970 ते 1972 पर्यंत जनसंघाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष होते. 1973 ते 1977 या काळात जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

• 1970 ते 1989 पर्यंत ते चार वेळा राज्यसभेचे सदस्य होते. दरम्यान, 1977 मध्ये ते जनता पक्षाचे सरचिटणीसही होते.

• 1977 ते 1979 पर्यंत ते केंद्रातील मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होते.

• ते 1986-91 आणि 1993-98 आणि 2004-05 पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 1989 मध्ये ते 9व्या लोकसभेसाठी दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आले.

• 1989-91 पासून ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते होते. 1991, 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये ते गांधीनगरमधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले.

• 1998 ते 2004 पर्यंत एनडीए सरकारमध्ये गृहमंत्री होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2002 ते 2005 पर्यंत ते उपपंतप्रधानही होते.

• 2015 मध्ये, त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून त्यांना हा सन्मान मिळाला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...