भाजपा आ. मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव
मुंबई दिनांक २ फेब्रुवारी २०२४
भारतीय जनता युवा मोर्चा दहिसर विधानसभा आयोजित नमो चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आ. मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत स्व. गोपीनाथ मुंडे मैदानात पार पडला. स्पर्धेत तब्बल २ हजार ६९० खेळाडूंनी विविध खेळांमध्ये भाग घेतला. क्रिकेट, बुद्धिबळ, टेबल टेनिस, कॅरम अशा खेळांचे आयोजन करण्यात आले.
नमो चषक स्पर्धा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडली. स्पर्धेची सांगता स्व. गोपीनाथ मुंडे मैदानात क्रिकेट सामन्याने झाली. यामध्ये ७० हुन अधिक संघांनी सहभाग घेतला. पुरुष संघ सामन्यांमध्ये डीएलसी दिनेश लाड क्रिकेट इलेव्हन संघ विजयी झाला. पंचशील नगर बी संघ उपविजेता ठरला. महिला क्रिकेट संघामध्ये बी.जे.व्हाय.एम युवती मोर्चा यांनी विजय मिळवला. एकविरा महिला मोर्चा उपविजेती टीम ठरली. तसेच वरिष्ठ नागरिकासांठी आयोजित क्रिकेट सामन्यांमध्ये एमसीएफ ए संघ विजयी ठरला तर असून डीडीपी युनिट ०२ संघाने उपविजेता पद पटकावले.
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना, द्रोणाचार्य पदक विजेते दिनेश लाड, राजू लाड, सुप्रसिद्ध महिला क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक, मुंबई प्रदेश महिला मोर्चा पदाधिकारी श्वेता परुळकर, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, उत्तर मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा योगिता पाटील, उत्तर मुंबई युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमर शहा, महामंत्री निखिल व्यास, बाबा सिंह, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल, जगदीश ओझा, हरीश छेडा, मंडळ अध्यक्ष अरविंद यादव, दहिसर विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली बागवे, दहिसर विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीधर पाटील, युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.