पुणे, दि.२४ नोव्हेंबर: उर्जेचा वापर करून रोग व्यवस्थापन आणि निरोगीपण आयुष्य जगण्यासाठी समाजला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेतर्फे ग्लॅमोवेल संस्थाच्या संस्थापक संचालक व मिसेस युनिव्हर्स डॉ. प्रचिती पुंडे यांना पहिला ‘यशकल्याणी राष्ट्रीय विज्ञान रत्न पुरस्कार’ २०२३ ने गौरविण्यात आले आहे. त्यांना हा पुरस्कार पुणे येथील सी मेटचे संचालक व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. भारत काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मान पत्र, स्मृती चिन्ह आणि रोख पारितोषिक असे पुरस्काराचे स्वरूप होते.
वसंतराव दिवेकर स्मृतिदिन व यशकल्याणी परिवाराच्या दशकपूर्ती वाटचाली निमित्त या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व विज्ञान संशोधक पद्मश्री अरिवंद गुप्ता, भारतीय नौसेनेचे रिअर अॅडमिरल रविंद्र नाडकर्णी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के.जी कानडे, आयसरचे विज्ञान संशोधक प्रा. अशोक रुपनेर, ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. वसंतराव पुंडे आणि संशोधक डॉ. प्रवीण देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शास्त्रज्ञ अरविंद गुप्ता म्हणाले,” निसर्गातील प्रत्येक गोष्टीत खेळणी लपलेली आहेत. झाले, पालापाचोळा, कचरा हा खेळणी बनवण्याचा कच्चा माल आहे. त्यातून निर्माण झालेली वैज्ञानिक खेळणी गरिबांच्या चेहर्यावरील हास्य फुलवतील व भविष्यातले शास्त्रज्ञ घडवितील.”
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. प्रचिती पुंडे म्हणाल्या,” विज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान संशोधक पद्मश्री अरिवंद गुप्ता व आयसरचे विज्ञान संशोधक प्रा. अशोक रुपनेर यांच्या बरोबर मझा जो सन्मान करण्यात आला ते शब्दात सांगता येणार नाही. माझे सौभाग्य आहे की यामुळे मला उजबेगिस्थान येथे एप्रिल व स्न्ड येथे मे महिन्यात विज्ञान परिषदेत भाग घेऊन पेपर प्रेझेंटेशनची संधी मिळाली आहे.”
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राला वाहून घेतलेल्या डॉ.प्रचिती पुंडे यांनी विज्ञान क्षेत्रात तब्बल २५ संशोधन ग्रंथ लिहिले आहे. त्यांनी आपल्या जीवनात चित्रकार, पत्रकार, किर्तनकार, कलाकार, डॉक्टर, लेखक, गायक, समाजसेवा, संशोधन, मिसेस इंडिया व मिसेस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया, मिसेस युनिव्हर्स वॅलरन्स पर्यंतची मजल मारली आहे. तसेच प्रोलेक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्सची स्थापना करून स्वःला उद्योजिका म्हणून प्रस्थापित केले आहे. या सर्व क्षेत्रात असतांना त्यांनी समाजसेवेचे धोरण कधीही सोडले नाही.
यशकल्याणी ग्रामीण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील यांनी प्रास्ताविक केले आणि सचिव अमृत खरे पाटील यांनी आभार मानले.