पुणे: अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक पार पडत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात होते. मात्र मविआमधून काँग्रेसने बारामतीची पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अजित पवारांना न्याय देण्याचा आमचा अट्टाहास आहे, असे आकाश मोरेंनी सांगितले.आता काँग्रेस थांबणार नाही, हा संदेश या माध्यमातून द्यायचा असल्याचेही मोरेंनी म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात प्रदेशाध्यक्ष सपकाळ गैरहजर राहून माघारीचे जणू संकेतच दिले आहेत. पराभवाच्या विक्रमासाठी काँग्रेसकडून उमेदवारी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झडत आहे. बारामती पोटनिवडणुक बिनविरोध होण्याच्या शक्यतेने लोभापोटी अपक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास झुंबड उडाल्याचे अखेरच्या दिवशी दिसून आले. 50 हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असून अनेक अर्जामध्ये गंभीर त्रुटी राहिलेल्या दिसून येत आहेत. घाईघाईने दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज केवल बारामती नव्हे तर राज्याच्या विविध भागातून उमेदवार बारामतीत दाखल झालेले पाहावयास मिळाले. प्रत्येकी माघार घेण्यास लाखों रुपये मिळणार असल्याची अफवा पसरली असून त्या लोभापोटी अर्ज दाखल झाल्याची चर्चा पाहावयास मिळाली. अर्थात छाननी मध्ये किती अर्ज वैध ठरतात त्यावरूनच बिनविरोध निवडणूक होते का ते निष्पन्न होणार आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत आक्रमक भूमिका मांडली. “बारामतीत काँग्रेसने निवडणूक लढवू नये. जर लढलीच तर त्यांचा असा पराभव करू की त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा थेट इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत काँग्रेसला भावनिक साद घातली. “अजित दादांचा बहुतांश राजकीय काळ काँग्रेससोबत गेला आहे. त्यांचे संबंध, सहवास आणि कामाचा इतिहास काँग्रेसशी जोडलेला आहे. त्यामुळे काँग्रेसने काही राजकीय संस्कार जपायचे असतील, तर त्यांनी बारामतीत निवडणूक लढवू नये आणि सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभं राहावं असे ते म्हणाले.
उमेदवार यादी (प्राब सौजन्य)


