सखल भागांतील पाणी साचण्याच्या समस्यांवर युद्धपातळीवर उपाययोजना करा – सभागृह नेते गणेश बिडकर

Date:

  • महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनावर सभागृहनेत्यांची बैठक संपन्न

पुणे (दि. ०६): शहरात गेल्या काही काळामध्ये कमी कालावधीत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेषतः उंच भागातून मोठ्या प्रमाणात वाहून येणारे पाणी सखल भागांमध्ये तुंबते, या पार्श्वभूमीवर सखल भागांतील आवश्यक कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात यावीत. पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना त्वरीत राबवाव्यात, अशी सूचना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी प्रशासनाला केली आहे.

आगामी पावसाळापूर्वी शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येत आहेत. सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीत बैठक पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन माधव जगताप, मलनिस्सारण विभागाचे मुख्य अधीक्षक अभियंता श्री. खानोरे, तसेच पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सदर बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख नाले/कॅनॉल ‘A’ मधील एकूण १२० ठिकाणांपैकी NDMA अंतर्गत सुरू असलेली कामे वगळता इतर ठिकाणी पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. मलनिस्सारण विभागामार्फत अशा ठिकाणांची यादी व अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्यानुसार आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. याबाबत सदर उपाययोजना कमी खर्चात अधिक परिणामकारक असतील यावर विशेष भर देण्यात येत येणार आहे.

यावेळी शहरातील पॅचमधील लाकडी पूल ते पुणे स्टेशन या दरम्यानच्या नाल्यांमध्ये साचलेला गाळामुळे नाल्यांची वहन क्षमता कमी झालेली असून त्यामुळे पावसाळ्यात सखल भागात पाणी साचण्याच्या घटना होत आहेत. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांना Excavator व तत्सम यंत्रांच्या सहाय्याने नाल्यांची तातडीने सफाई करण्याच्या सूचना गणेश बिडकर यांनी केली आहे.

नाल्यांमध्ये झालेली अतिक्रमणे ही नाल्यांच्या सखल भागात पाणी साचण्याचे प्रमुख कारण असल्याने अतिक्रमण विभागामार्फत अशा ठिकाणी तातडीने कारवाई करून नाल्यांचा प्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाला व पावसाळी लाईन साफसफाईच्या कामांची गती वाढविण्यासाठी अनुभवी व गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या कंत्राटदारांची निवड करून तातडीने सदर कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश बैठकीत ठरल्याप्रमाणे महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.

सभागृह नेते गणेश बिडकर यांची प्रतिक्रिया

“सखल भागांमध्ये पाणी साचण्याची समस्या गंभीर असून, नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी नालेसफाई, अडथळे दूर करणे आणि अतिक्रमणांवर कारवाई ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून पावसाळ्यापूर्वी ही कामे वेळेत पूर्ण करावीत,” असे निर्देश दिले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सिलेंडरसाठी वंचित आघाडीचे पुण्यात आंदोलन

चूल पेटवून केला निषेध पुणे —घरगुती गॅस सिलेंडरच्या...

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

• मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणिटाटा मेमोरियल सेंटर...

भाजपा वर्धापनदिनानिमित्त सेवा सप्ताहात वैकुंठ स्मशानभूमी सह विविध संस्थांना साहित्य वाटप – संदीप खर्डेकर.

दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आमची ऊर्जा - मंजुश्री खर्डेकर. पुणे-वैकुंठ...