सिलेंडरसाठी वंचित आघाडीचे पुण्यात आंदोलन

Date:

चूल पेटवून केला निषेध

पुणे —
घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांविरोधात तसेच सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अँड. अरविंद तायडे यांनी केले .

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड. प्रियदर्शी तेलंग, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल अण्णा जाधव, अ‍ॅड. सर्वजित बनसोडे, युवा सदस्य विशाल गवळी, ज्येष्ठ नेते वसंत दादा साळवे, पुणे जिल्हा अध्यक्ष (पूर्व) राजकुमार, पश्चिम अध्यक्ष संतोष लोखंडे, शहर अध्यक्ष अ‍ॅड. अरविंद तायडे, पिंपरी-चिंचवड महिला आघाडी अध्यक्षा शारदाताई बनसोडे, महासचिव संजीवन कांबळे, युवा आघाडी अध्यक्ष सागर आल्हाट, माथाडी अध्यक्ष विशाल कसबे आणि अ‍ॅड. रेखाताई चौरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष चूल पेटवून चुलीवर पिठलं-भाकरी आणि ठेचा तयार करत शासनाचे लक्ष वेधले. “गॅस सिलेंडर महाग झाल्यामुळे सामान्य नागरिकांना पुन्हा पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे,” असा तीव्र संदेश या कृतीतून देण्यात आला.

यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनासोबत प्रतीकात्मक स्वरूपात पिठलं-भाकरी व ठेचा यांची डिश देत सरकारने सर्वसामान्यांच्या अडचणींची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारने तातडीने गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत, तसेच घरगुती सिलेंडरची नियमित आणि अखंड उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी केली. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सखल भागांतील पाणी साचण्याच्या समस्यांवर युद्धपातळीवर उपाययोजना करा – सभागृह नेते गणेश बिडकर

महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनावर सभागृहनेत्यांची बैठक...

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

• मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणिटाटा मेमोरियल सेंटर...

भाजपा वर्धापनदिनानिमित्त सेवा सप्ताहात वैकुंठ स्मशानभूमी सह विविध संस्थांना साहित्य वाटप – संदीप खर्डेकर.

दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आमची ऊर्जा - मंजुश्री खर्डेकर. पुणे-वैकुंठ...