समर्थ पथ कर्वेनगर पुन्हा पाण्यात ..”सफाई” ची चौकशी करा

Date:

 पुणे- समर्थ पथ कर्वेनगर येथे कोट्यावधी रुपये खर्च करूनही पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आजच्या पावसाने प्रशासनाने येथे केलेले पावसाळी लाईन सफाई चे काम वाहून गेले.आणि पुणेकरांचे कोट्यावधी रुपये वाया जाऊन हाल पदरी पडले त्यामुळे येथील “सफाई” ची चौकशी व्हावी अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे .

खर्डेकर यांनी असे म्हटले आहेकी,’समर्थ पथ कर्वेनगर येथे प्रतिज्ञा मंगल कार्यालय परिसरात 2023 मध्ये झालेल्या मुसळधार पावसात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.इतकी की स्वतः तत्कालीन आयुक्त विक्रमकुमार यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व चिंतामणी, मोरेश्वर, राहुल कॉम्प्लेक्स, गंगानगरी व इतर इमारतीं मध्ये घुसलेले पाणी काढण्यासाठी पुरेशी यंत्रणा तर लावलीच पण स्वतः 4 तास तेथे थांबून होते. त्या भागातील आजची परिस्थिती ही पुन्हा पूर सदृश आहे आणि त्याच बरोबर इमारतीतील विजेच्या मीटर पर्यंत पाणी शिरल्याने लाईट बंद करण्याची वेळ आली.2023 ला मनपा आयुक्तांनी कबूल केल्याप्रमाणे येथे मोठ्या व्यासाची पावसाळी लाईन टाकण्याचे काम झाले मात्र आश्चर्यकारकरीत्या 100 मीटर चे काम न झाल्याने पुन्हा एकदा येथील नागरिक अडचणीत आहेत.सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे मनपा ची यंत्रणा हलवील्यावर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांची टीम तेथे पोहोचली व त्यांनी अडकलेला कचरा काढल्यावर लगेचच पाण्याचा निचरा झाला.

याचाच अर्थ सफाई चे कोट्यावधी पाण्यात गेले आणि त्याचा त्रास मात्र करदाते पुणेकर भोगत आहेत.

तरी ह्या “सफाई” ची चौकशी व्हावी व  दोषींवर कारवाई करतानाच येता पावसाळा सुखावह कसा होईल यासाठी योजना आखून पुढील तीन महिन्यात त्याची अंमलाबजावणी करावी अशी आपली आग्रही मागणी आहे. असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.

,

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुळशीबाग श्रीराम मंदिरात हनुमान जयंती सोहळा

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आयोजन ; कीर्तनकार दर्शनबुवा...

वीजपुरवठ्याची लपाछपी:वीज कर्मचाऱ्यांची कसरत

झाडे पडणे, पाणी तुंबल्यामुळे वीजवाहिन्या बाधित-दुरुस्तीचे काम वेगाने सुरू पुणे, दि. २ एप्रिल,...

पुण्याला वादळी पावसाने झोडपले:पिंपळाचे झाड कोसळल्याने साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

रस्त्यांवरून जणू वाहू लागले ओढे नाले,नद्या ... पुणे:आज शहर आणि...