वीजपुरवठ्याची लपाछपी:वीज कर्मचाऱ्यांची कसरत

Date:

झाडे पडणे, पाणी तुंबल्यामुळे वीजवाहिन्या बाधितदुरुस्तीचे काम वेगाने सुरू

पुणे, दि. २ एप्रिल, २०२६ – पुणे शहर व परिसरात गुरुवारी (दि. २) दुपारी विजांच्या कडकडाटासहझालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळामुळे अनेक अतिउच्चदाब (EHV) व उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड (Tripping) झाल्याने पुणे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठ्यावर त्याचा परिणाम झालेला असून महावितरणचे वीज कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर परिश्रम घेत आहेत. अनेक भागांचा बाधित झालेला वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरु देखील करण्यात आला आहे.

साधारणत: तासभर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहिन्यांवर झाडे पडली आहेत. तर काही ठिकाणी फिडर बॉक्स पाण्यात गेल्यामुळे वीज वाहिन्या बंद पडल्या. तर विजेच्या कडकडाटांमुळे ही काही ठिकाणी वीज वाहिन्या बाधित झाल्या आहेत.

कोथरुड – भागात कुंदनगरी फिडरवर विजेच्या कडकडाटामुळे आकाशातील विजेला अटकावर करणारी यंत्रणा बाधित झाली. त्यामुळे संबंधित वाहिनीचा वीजपुरवठा ठप्प झाला होता. मात्र पर्यायी मार्गाने या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. आता केवळ २ रोहित्र बंद आहेत. नांदेडसिटी अतिउच्चदाब वाहिनीवर ट्रिपिंग आल्यामुळे अर्ध्यातासासाठी कोथरुड विभागातील वीजपुरवठा बाधित झाला होता. पाऊस थांबताच वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

शिवाजीनगर – विभागातील विद्यापीठ, खडकी, बावधन, बाणेर, शिवाजी हाऊसिंग सोसायटी या वाहिन्यांचा वीजपुरवठा बाधित झाला असून विद्यापीठ वाहिनी सुरु करण्यात यश मिळाले.

पिंपरी/भोसरी – या भागातील रावेत २२ केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा खंडित झाला असून, यावरील ५८ रोहित्रे बंद पडली आहेत. त्याला पर्यायी मार्गाने सुरु करण्याचे प्रयत्न महावितरण कर्मचारी करीत आहेत.

पर्वती – या भागातील महावितरणच्या जुन्या पर्वती वीज उपकेंद्रातील फिडरवर झाड पडले होते. त्याला हटवून वीजपुरवठा सुरु करण्याचे काम सुरु आहे. तर प्रयेजा व मधुकोश वाहिनीच्या इनकमिंग फिडर बॉक्स भागात पाणी साचल्याने वीजपुरवठा बंद झाला आहे. खडकवासला, श्रवण वाहिनीच्या पेट्रोलिंगचे काम हाती घेतली असून, बिघाड सापडताच दुरुस्ती केली जाणार आहे.

बंडगार्डन – या विभागात वडाचीवाडी या उपरी वीज वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्याने त्या भागातील वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला आहे. तर वाडिया वाहिनीला तासाभरातच पर्यायी मार्गाने सुरु करण्यात आले आहे.

रास्तापेठ- विभागातील कोंढवा, येवलेवाडी या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या अतिउच्चदाब वाहिनीवर परिणाम झाल्याने या भागातील वीजपुरवठा देखील बाधित झालेला आहे.

या व्यतिरिक्‍त काही भागात लघुदाब वाहिन्यांवर देखील पावसाचा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. वीज ग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे. महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत.

विजेच्या तक्रारींसाठी टोल फ्रीचा वापर करावा

वीजग्राहकांनी विजेसंबंधिच्या सर्व तक्रारींसाठी महावितरणच्या 1912, 18002333435 व 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. हे क्रमांक www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व वीजबिलावर प्रकाशित केले आहेत. महावितरणच्या मोबाईल ॲपवर देखील सर्व सुविधा २४ तास उपलब्ध आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे महापौरांचे आदेश,दिड तासात पुण्यात ३६ ते १०४ मिमी पाऊस

पुणे- महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि.०२/०४/२०२६ रोजी सायंकाळी ३.३० ते ०५.००...

तुळशीबाग श्रीराम मंदिरात हनुमान जयंती सोहळा

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आयोजन ; कीर्तनकार दर्शनबुवा...

समर्थ पथ कर्वेनगर पुन्हा पाण्यात ..”सफाई” ची चौकशी करा

 पुणे- समर्थ पथ कर्वेनगर येथे कोट्यावधी रुपये खर्च करूनही...

पुण्याला वादळी पावसाने झोडपले:पिंपळाचे झाड कोसळल्याने साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

रस्त्यांवरून जणू वाहू लागले ओढे नाले,नद्या ... पुणे:आज शहर आणि...