पुण्याला वादळी पावसाने झोडपले:पिंपळाचे झाड कोसळल्याने साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

Date:

रस्त्यांवरून जणू वाहू लागले ओढे नाले,नद्या

पुणे:आज शहर आणि परिसरात दुपारनंतर काळोख दाटून आला. त्यानंतर काही मिनिटांतच मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. अनेक भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला, तर काही ठिकाणी गारपिटीची नोंदही झाली. या अचानक बदलामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. पुण्यात सिंहगड रोडवरील नवश्या मारुती मंदिरा शेजारील पिंपळाचे भले मोठे झाड कोसळले. यात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या या पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी तर रस्त्यांवरून अक्षरशः पाण्याचे प्रवाह वाहताना दिसले. सिंहगड रोड, मणिकबाग, कोंढवा बुद्रुक, प्राईड हॉस्पिटल परिसर, धानोरी आणि बालाजीनगर या भागांत पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही वाहनं पाण्यात अडकून थांबली, तर अनेकांनी वाहनांच्या हेडलाईट सुरू करूनच प्रवास केला.स्वारगेट बस स्थानक जणू पाण्याचे तळे बनले तर सिंहगड रस्त्याला देखील नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते .सेनापती बापट रस्ता , कर्वे रोड आणि एकूणच उपनगरातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली होते.

उन्हाळ्याचा काळ असल्याने नागरिक छत्री किंवा रेनकोट न घेता घराबाहेर पडले होते. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची चांगलीच धांदल उडाली. जवळपास तासभर सुरू असलेल्या मुसळधार सरींमुळे शहरात वाहतुकीवर परिणाम झाला. पिंपरी-चिंचवड परिसरातही याच स्वरूपाचा पाऊस पडला आणि उद्योगनगरीतही अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून आले.

पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात अवकाळी पावसात एक दुर्दैवी घटना घडली असून नवश्या मारुती मंदिराशेजारील पिंपळाचे भले मोठे झाड अचानक कोसळल्याने एका साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मृत महिलेचे नाव रंजना नवनाथ गिरी (वय 60) असे असून त्या परिसरात फुल विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दररोजप्रमाणे त्या मंदिराजवळ आपला व्यवसाय करत असताना अचानक हे झाड कोसळले. झाड कोसळण्याचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले.स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत महिलेस झाडाखालून बाहेर काढले. मात्र त्यावेळी त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे महापौरांचे आदेश,दिड तासात पुण्यात ३६ ते १०४ मिमी पाऊस

पुणे- महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि.०२/०४/२०२६ रोजी सायंकाळी ३.३० ते ०५.००...

तुळशीबाग श्रीराम मंदिरात हनुमान जयंती सोहळा

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आयोजन ; कीर्तनकार दर्शनबुवा...

समर्थ पथ कर्वेनगर पुन्हा पाण्यात ..”सफाई” ची चौकशी करा

 पुणे- समर्थ पथ कर्वेनगर येथे कोट्यावधी रुपये खर्च करूनही...

वीजपुरवठ्याची लपाछपी:वीज कर्मचाऱ्यांची कसरत

झाडे पडणे, पाणी तुंबल्यामुळे वीजवाहिन्या बाधित-दुरुस्तीचे काम वेगाने सुरू पुणे, दि. २ एप्रिल,...