पुणे-—
विष्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) च्या सोशल वेलफेअर डेव्हलपमेंट कमिटी
अंतर्गत टीम स्पंदन तर्फे सिंहगड किल्ल्यावर गड संवर्धन मोहीम तसेच खडकवासला धरण
परिसरात स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पडले.
या उपक्रमामध्ये 80 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी
परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून 25 पेक्षा अधिक पोते म्हणजेच 300+
किलो कचरा संकलित केला, ज्यामुळे ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जपण्याचा महत्त्वपूर्ण
संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
या उपक्रमाचे नेतृत्व सार्थक देशमुख आणि रुचिता बाबर यांनी केले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध
पद्धतीने किल्ला व धरण परिसर स्वच्छ करत “आपला वारसा जपूया, पर्यावरण वाचवूया”
हा संदेश दिला.
गड-किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे व पराक्रमाचे जिवंत प्रतीक असून
त्यांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ऐतिहासिक वारसा
जपण्याबरोबरच समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम
राबविण्यात आला. किल्ल्यांचे महत्त्व ओळखून त्यांचे संवर्धन करणे हीच महाराजांना खरी
आदरांजली असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.या मोहिमेचा उद्देश तरुणांमध्ये
सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि
ऐतिहासिक वारसा जतन करण्याची भावना निर्माण करणे हा होता.
VIT च्या विद्यार्थ्यांनी समाजासाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
भविष्यातही Team स्पंदन तर्फे अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन
करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

