हडपसरच्या सुरज रमेश पंडीत टोळीवर मोक्का कारवाई

Date:

पुणे-हडपसर मध्ये आपली दहशत पसरविणाऱ्या, वाहनांची तोडफोड करणा-या सुरज रमेश पंडीत ( टोळी प्रमुख) व त्यांचे इतर १० साथीदार यांचेवर पुणे पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
यातील फिर्यादी यांना दिनांक २५/१०/२०२३ रोजी गोसावी वस्ती, सुरक्षानगर रोड, हडपसर, पुणे येथे घराचे जिन्या मध्ये येवुन यश जावळे व युवराज बढे हे त्यांचे हातात धारदार लोखंडी हत्यार घेवुन तसेच त्यांचेबरोबर त्यांचे मित्र सुरज पंडीत, समीर ऊर्फ रॉम शेख, अक्षय राउत व इतर ४-५ अनोळखी इसम मोठमोठ्याने ओरडून व शिवीगाळ करुन फिर्यादी व त्यांचे वडीलांना मारहाण करुन जबरदस्तीने एकुण ३०,०००/- रुपये किंमतीचे सोन्याची अंगठी व रोख रक्कम असे घेवुन जावुन सार्वजनिक रोडवर येवुन हातातील लोखंडी हत्यार हवेत फिरवुन ” आमचा नाद कोणी करायचा नाही आम्ही भाई लोक आहोत असे बोलुन दहशत निर्माण केली व सार्वजनिक रोडच्या कडेला पार्क केलेल्या एकूण २२ वाहनांची त्यांचे कडील लोखंडी वस्तूच्या सहाय्याने तोडफोड करून आर्थिक नुकसान केलेले आहे म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६३१ / २०२३, भा.दं.वि. कलम ३९५, ३२३,४२७, ५०६, ५०४, आर्म अॅक्ट कलम ४(२५), क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट कलम ३७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील निष्पन्न आरोपी १) सुरज रमेश पंडीत, वय-२९ वर्षे, रा. निलेश क्लासिक सोसायटी, ए विंग, फ्लॉट २१, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख) २) यश प्रदिप जावळे, वय २३ वर्षे, रा. श्रीराम चौक, गुलाम अलीनगर, सातवनगर रोड, हडपसर, पुणे ३) युवराज प्रकाश बढे, वय २३ वर्षे रा. साई कॉलनी, वाडकरमळा, मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे आ.क्र.१ ते ०३ यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. ४) अक्षय राऊत, रा. सैय्यदनगर, महंमदवाडी रोड, पुणे ५) समीर बागवान, रा. वाडकर मळा, महंमदवाडी रोड, पुणे ६) शिवा कानगुले रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड, पुणे (टोळी सदस्य) इतर ४ ते ५ अनोळखी इसम हे WANTED आरोपी आहेत.
गुन्हयाचे तपासा मध्ये सदर आरोपी सुरज रमेश पंडीत ( टोळी प्रमुख) याने गुन्हेगारी टोळी तयार केली असून ते सर्व हडपसर, काळे पडळ, गोसावीवस्ती, हांडेवाडी रोड, या भागात त्यांचे टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी संघटीत गुन्हे करीत असले बाबत तपासामध्ये निदर्शनास आले आहे. तसेच ते व त्यांचे इतर साथीदार मिळुन परिसरातुन कोयते हत्यारे दाखवुन खंडणी स्वरुपात पैसे उकळतात. छोटे व्यवसायिक व दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करुन त्यांचे मनामध्ये दहशत निर्माण करुन त्यांचेकडुन हप्ता घेतात. त्यांचे दहशतीमुळे नागरीकांचे मनात भिती निर्माण झालेली असुन त्यांचे विरुध्द कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने सदरील टोळीचे वर्चस्व हडपसर परीसरात वाढत असल्याचे दिसुन येत आहे
तसेच त्याचे विरुध्द पुणे शहर, पुणे ग्रामीण मधील वेग-वेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील ०२ आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेविरूध्द यापुर्वी घातक शस्त्राने जिवे ठार मारणे, जबर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, खंडणी गोळा करणे, नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे अशा प्रकारे स्वतःस व टोळीचे सदस्यास अवैध मार्गाने आर्थिक लाभ व इतर फायदा व्हावा या उददेशाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार संघटितपणे करीत आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

प्रस्तुत गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(२), ३(४) चा अंतर्भाव करणे कामी,हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ -०५, पुणे शहर, विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६३१ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९५, ३२३,४२७,५०६,५०४,आर्म अॅक्ट कलम ४ (२५), क्रिमिनल लॉ अॅमेंटमेंट अॅक्ट कलम ३७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे, श्रीमती. अश्विनी राख हया करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त पुणे संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, मा.पोलीस उप-आयुक्त परीमंडळ – ५,पुणे शहर, विक्रांत देशमुख, सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्विनी राख, त्यांचे मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), संदिप शिवले, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती. सारिका जगताप, पोलीस उप-निरीक्षक महेश कवळे, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार, प्रविण शिंदे, महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे, हनुमंत झगडे यांनी कारवाई केली आहे.
मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर, रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारीक लक्ष देवुन, शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मोक्का अंतर्गत केलेली ही ८६ वी कारवाई आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...