Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पीसीसीओईला “उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार” जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान.

Date:

पिंपरी, पुणे (दि २८ जानेवारी २०२४) राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते “उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार २०२४” देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २०२३ मध्ये निवडणूक साक्षरता अभियान अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मताधिकार, लोकशाही यासंबधी केलेली जागृती, नवमतदार नोंदणी करणे यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम पीसीसीओईने राबविले. त्याबद्दल “उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार २०२४” देऊन आणि उत्कृष्ट नोडल ऑफिसर म्हणून प्रा. दिनेश कुटे यांना गौरविण्यात आले.
पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयात (दि.२५ जानेवारी) झालेल्या कार्यक्रमात यावेळी पुणे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पुणे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे, पुणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्विप नोडल अधिकारी पुणे जिल्हा अर्चना तांबे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंगचे निवडणूक साक्षरता मंडळाचे नोडल ऑफिसर तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. दिनेश कुटे व विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित बनसोडे यांनी पुरस्कार स्वीकारला. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण व विकास अधिष्ठाता डॉ. प्रविण काळे, विद्यार्थी कल्याण व विकास सह अधिष्ठाता डॉ. अजय गायकवाड यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड

पुणे- सह्याद्री रुग्णालयात एका व्यक्तीचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या...

गोव्यात नाईटक्लबपासून हॉटेल्सपर्यंत सर्व आस्थापनांची होणार सुरक्षा पुनर्तपासणी

“हडफडेची पुनरावृत्ती नाही! गोवा सरकारची कठोर भूमिका; संयुक्त अंमलबजावणी...

शीतल तेजवानीचा आता थेट रणबीर कपूरवर निशाणा!

पुणे-कोरेगाव पार्क , मुंढवा येथील गाजलेल्या 40 एकराच्या सरकारी...