तुळशीबाग राम मंदिरात पं. आनंद भाटे यांचे भावमधुर गायन

Date:

 श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सव ; उत्सवाचे २६५ वे वर्ष

पुणे : “दशरथ हा घे हे पायच दान…”, “मन हो राम रंगी रंगले…”, “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल…”, “आगा वैकुंठीच्या राया…”, “पंढरी निवास सखा पांडुरंगा…” अशा भक्तिगीतांनी तुळशीबाग राम मंदिर परिसरात भक्तिरसाची अविस्मरणीय मैफल रंगली. प्रख्यात गायक पंडित आनंद भाटे यांनी सादर केलेल्या भावमधुर गायनाने उपस्थित भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग यांच्या वतीने श्रीरामनवमी उत्सवानिमित्त तुळशीबाग राम मंदिर येथे आनंद भाटे यांच्या सुश्राव्य गायनाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या उत्सवाचे अखंडित २६५ वे वर्ष साजरे होत आहे. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले तसेच विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले आणि कोटेश्वर तुळशीबागवाले यांच्यासह तुळशीबागवाले परिवाराने या उत्सवाचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात राग यमन कल्याणने करून काही भक्तिरचना आनंद भाटे यांनी सादर केल्या. “पंढरी निवासा सखा पांडुरंगा…” या भक्तीगीतानंतर अतिशय दुर्मिळ गायली जाणारी प्रभू रामचंद्रांना समर्पित ‘रघुराजा हा माझा विसावा’ ही भक्तीरचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले यांनी सांगितले की, पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली या भव्य मंदिराची स्थापना केली. यंदा २ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवांतर्गत श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा तसेच श्रीरामराज्याभिषेक सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यासोबतच रामायण वाचन, प्रवचन आणि संगीत कार्यक्रम अशा सांस्कृतिक उपक्रमांचाही समावेश आहे. हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के कर सवलत हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणारा

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या...

५४ किमी भुयारी रस्ते, नदी पुनरुज्जीवन आणि गृहनिर्माण प्रकल्पांना चालना

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या...