Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अनिल कोठारीसह दोघांना ‎सात दिवसांची पोलिस कोठडी

Date:

फॉरेन्सिक ऑडीटनुसार बँकेच्या ‎ठेवीदारांच्या २९१ कोटी २५ लाखाच्या ‎रकमेचा अपहार झाला असून, या गुन्ह्यात‎ अनिल कोठारी व मनेष साठे यांचा सक्रिय‎ सहभाग आहे, त्यामुळे दोघेही या अपहारास‎ जबाबदार आहेत. २ एप्रिल २०१६ रोजी साठे‎यांच्या खात्यात रोख स्वरुपात ६ लाख रुपये ‎जमा झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.‎

नगर:‎नगर अर्बन बँकेच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी‎आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक‎ केलेले अनिल कोठारी व मनेष साठे या दोन माजी‎ संचालकांना विशेष न्यायालयाने ७ दिवसांची‎(२ फेब्रुवारीपर्यंत) पोलिस कोठडी‎सुनावली. विशेष न्यायाधीश प्रशांत शिंत्रे‎ यांनी शनिवारी हे आदेश दिले. फॉरेन्सिक‎ अहवालातून या दोघांच्या खात्यात‎ कर्जदारांच्या खात्यातून पैसे वर्ग झाल्याचे‎ स्पष्ट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.‎

गुरुवारी (२५ जानेवारी) सायंकाळी‎ अनिल कोठारी व मनेष साठे या दोघांना‎ ताब्यात घेतल्याची माहिती आर्थिक गुन्हे‎अन्वेषण शाखेचे उपअधीक्षक हरिष‎ खेडकर यांनी दिली होती. त्यानंतर प्रकृती‎ बिघडल्याने दोघांनाही जिल्हा रुग्णालयात‎उपचारांसाठी दाखल केले होते. त्यांची ‎प्रकृती सुधारल्याने शुक्रवारी (२६ जानेवारी) ‎‎सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात‎आले. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी‎त्यांना लगेच अटक केली व शनिवारी‎ सकाळी न्यायालयासमोर हजर केले. सरकार ‎‎पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. मंगेश दिवाणे ‎यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, की दोन्ही ‎‎आरोपींच्या खात्यावर कर्जदारांच्या‎खात्यातून पैसे वर्ग झाले आहेत. त्यामुळे ‎त्यांच्या खात्यात आलेल्या या पैशांसह अन्य ‎‎पैशांचे व्यवहार तपासायचे आहेत. या रकमा ‎‎त्यांच्या खात्यात कोठून, कोणी व का ‎पाठवल्या, याची माहिती घ्यायची‎असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. बँकेचे‎ तत्कालीन अध्यक्ष व कुटुंबीयांची चौकशी‎ सुरू असून, अन्य संचालकांसह‎अधिकाऱ्यांचाही शोध सुरू असल्याचे‎तपासी अधिकारी खेडकर यांनी सांगितले.‎

दोन्ही संचालकांचे वैयक्तिक व्यवहार‎असल्याचा आरोपींच्या वतीने वकिलांनी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केला. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस‎ दिली नाही, जबाब घेतले नाहीत. पूर्वी ज्यांना ‎नोटीसा दिल्या, त्यांच्यावर कारवाई नाही.‎तसेच आरोपींना नोटीसा न देता त्यांच्यावर‎थेट कारवाई केल्याचे म्हणणे आरोपींच्या ‎वकिलांनी मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद‎ऐकल्यावर न्यायालयाने अनिल कोठारी व‎मनेष साठे यांना २ फेब्रुवारीपर्यंत पोलिस‎कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.‎

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मद्यतस्करी :18 लाखाचा मुद्देमाल जप्त,3 गजाआड

पुणे :दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ...

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार ‘दिव्यांग भूषण 2025’ पुरस्काराने सन्मानित

नागपूर, दि. 9 डिसेंबर 2025: महावितरणमधील दिव्यांग अधिकारी आणि...

२०२६ साठी २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; ‘भाऊबीजे’ला अतिरिक्त सुट्टी

मुंबई, दि. ९: महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व...

लोकमान्यनगरच्या पुनर्विकासासाठी — ११ डिसेंबरला ‘घंटानाद आंदोलन’

 नागपुरातील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यनगरचा आवाज बुलंद करण्याची तयारी —...