सॅनिटरी नॅपकिन सह जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटी बद्दल जनजागृती ची आवश्यकता – मंत्री चंद्रकांतदादा पाटील.

Date:

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप च्या वतीने सेवा भवन येथे इंसिनरेटर ची सुविधा

पुणे: सॅनिटरी नॅपकिन वापरल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. स्वच्छता सेवक विविध प्रकारचा कचरा गोळा करतात, यात ओला, सुका, जैविक, इ कचरा आणि रेड डॉट कचऱ्याचा समावेश आहे. मात्र यातील जैविक कचरा आणि सॅनिटरी पॅड ची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता असल्याचे ही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप च्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती संचालित सेवा भवन येथे इन्सिनरेटर (केरकचरा, इत्यादी जाळून टाकण्याची भट्टी) बसविण्यात आले, त्याचे लोकार्पण करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त सौ. मंजुश्री खर्डेकर,जनकल्याण समितीचे प्रांत कार्यवाह राजन गोऱ्हे, कार्यकारिणी सदस्य विनायकराव डंबीर, सह खजिनदार चंदनजी कटारिया, प्रमुख अतिथी कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधाताई एडके,कोथरूड महिला मोर्चा अध्यक्ष कांचनताई कुंबरे,कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ.संदीप बुटाला,उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, मा. नगरसेविका वासंतीताई जाधव इ मान्यवर उपस्थित होते.
पॅडमॅन चित्रपटामुळे मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन बाबतीत नागरिक मोकळेपणाने बोलायला लागले, त्याची उपयुक्तता ही सर्वांना पटली मात्र अद्याप सॅनिटरी नॅपकिन च्या विल्हेवाटी बद्दल पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे लक्षात आल्यामुळे क्रिएटिव्ह फाउंडेशन ने हा उपक्रम हाती घेतल्याचे संदीप खर्डेकर आणि मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले. येणाऱ्या काळात कचऱ्याची समस्या गंभीर होणार आहे त्यामुळे आम्ही आमचा सामाजिक कार्यासाठीचा राखीव निधी हा कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटी साठी खर्च करणार असल्याचे ग्लोबल ग्रुप चे संचालक संजीव अरोरा आणि मनोज हिंगोरानी यांनी जाहीर केले.क्रिएटिव्ह फाउंडेशन लवकरच मोफत रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरु करणार असून या वर्षात आरोग्य विषयक कार्यक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे क्रिएटिव्ह चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...