वर्षभरात ६ हजार ५१० किलो स्फोटके आणि ७६७ इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) जप्त

Date:

पुणे-केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) गेल्या वर्षभरात दहशतवादी कारवायांचे मनसुबे उधळून लावत मोठी कामगिरी केली आहे. या कालावधीत ६ हजार ५१० किलो स्फोटके आणि ७६७ इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) जप्त करण्यात आले. या धडक कारवाईमुळे देशावरील संभाव्य मोठे संकट टळले असून, अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण वाचले, अशी माहिती डीआयजी के.के. पांडे यांनी दिली. विविध राज्यांतील संवेदनशील भागांत राबविण्यात आलेल्या शोधमोहिमांदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

या यशामागे पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ही संस्था सुरक्षा दलांना आयईडी शोधणे आणि निकामी करण्याबाबत अत्याधुनिक प्रशिक्षण देते. २०१२ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या १४ वर्षांत आपली क्षमता लक्षणीयरीत्या वाढवली आहे. आतापर्यंत १२ हजार ५५३ हून अधिक अधिकारी व जवानांना येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे, ज्यात विविध राज्यांचे पोलिस दल, केंद्रीय सशस्त्र पोलिस दले आणि मित्र राष्ट्रांतील प्रतिनिधींचा समावेश आहे.

संस्थेचे महासंचालक व प्राचार्य के. के. पांडे यांनी सांगितले की, प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असले तरी प्रत्यक्ष कारवाईत मानवी निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. उपकरणे आणि प्रशिक्षित जवानांच्या समन्वयामुळे आयईडी शोधण्याची व निकामी करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, परिणामी घातपाताच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आयआयएमला सीआरपीएफची ‘सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था’ म्हणून गौरविण्यात आले.

भविष्यात ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देत डीआरडीओच्या सहकार्याने स्वदेशी उपकरणांच्या निर्मितीसाठी संशोधन सुरू असल्याची माहितीही पांडे यांनी दिली. तसेच, प्रशिक्षण प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यावर भर दिला जाणार असून, प्रतिकूल हवामानातही आभासी माध्यमातून सराव सुरू ठेवण्याची योजना आहे. सामान्य नागरिकांसाठीही आयईडीविषयक जागरूकता साहित्य लवकरच ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ४३ देशांतील ११६ चित्रपटांचा सहभाग

चित्रपट प्रेमींना सर्व चित्रपट पूर्णपणे विनामूल्य पाहण्याची सुवर्णसंधीपिंपरी :...

इराणवरील हल्ल्यात अँथ्रोपिक AI चा वापर

लक्ष्य ओळखण्यात मदत घेतली; व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना पकडण्यातही याच टूलची...

पुण्यात एनडीआरएफचे ‘मोबिलायझेशन ड्रिल’; ‘पीडीआरएफ’ची दमदार कामगिरी!

पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाची आपत्ती व्यवस्थापन सज्जता सिद्ध! पुणे: "कोणतीही आपत्ती...

महाराष्ट्रातील 50 हजार मुस्लीम भाविक सौदीत अडकल्याची भीती

रमजानच्या पवित्र महिन्यात 'उमरा' या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात...