इयत्ता दहावी-बारावी खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव १५ एप्रिलपर्यंत करावेत ऑनलाईन सादर

Date:

पुणे, दि. २७ फेब्रुवारी २०२६ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रान्वये फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

मागील वर्षांप्रमाणे यंदाही निकाल लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांचेकडून विभागीय मंडळाकडे केवळ ऑनलाईन पद्धतीनेच सादर करण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टल या संकेतस्थळावर https://aaplesarkar.mahaonline.gov.in⁠� या लिंकद्वारे प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित प्रस्ताव दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत स्वीकारण्यात येतील.

विद्यार्थी, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विहित कागदपत्रांसह अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे यांचेकडे सादर करावेत. ऑनलाईन प्रणालीसंदर्भातील सविस्तर कार्यपद्धती User Manual मध्ये नमूद करण्यात आली असून त्यानुसार प्रस्ताव भरावेत. प्राप्त प्रस्तावांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

पोर्टलवर अर्ज भरताना तांत्रिक अडचण आल्यास १८००१२०८०४० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच क्रीडा गुण प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात इतर अडचणी असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे येथील श्रीमती अश्विनी हत्तरगे (७३८७८८०४२७), श्री. दादासाहेब देवकते (९९२३९०२७७७), श्री. शिवाजी कोळी (७०२०३३०४८८) व श्रीमती ज्योती सुर्यवंशी (७७९८३०२४८१) यांच्याशी संपर्क साधावा. विहित कागदपत्रे सादर न केल्यास प्रस्ताव अपात्र करण्यात येतील. अशा वेळी त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने पुन्हा सादर करण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील क्रीडा शिक्षक, शिक्षक मुख्याध्यापक व प्राचार्य यांची राहील. त्रुटींबाबतची माहिती संबंधितांना ऑनलाईन प्रणालीद्वारे कळविण्यात येईल. मुदतीनंतर कोणतेही प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार नाहीत.
विहित मुदतीत कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे श्री. जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांच्या विमान अपघातावर पतंगबाजी नको:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

सुनेत्रांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय आमचा नव्हे राष्ट्रवादीचा होता विलिनीकरणाच्या सीक्रेटची...

घायवळ टोळीतील मोकाचा फरार आरोपी अखेरीस पोलिसांच्या जाळ्यात

पुणे-गुंड निलेश गायवळ टोळीतील चार महिन्यांपासून फरार असलेल्या दोन...

लग्नानंतर तीन महिन्यांतच सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या: बाणेर परिसरातील घटना

पुणे-पुणे शहरातील बाणेर परिसरात हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरून एका...

क्षेत्रीय कार्यालयांची रचना विशिष्ट राजकीय पक्षाच्या फायद्याची असल्याचा आरोप:आयुक्तांकडे लेखी तक्रार

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे क्षेत्रीय कार्यालये...