पुणे-गुंड निलेश गायवळ टोळीतील चार महिन्यांपासून फरार असलेल्या दोन मोक्का गुन्ह्यातील आरोपीस वारजे माळवाडी पोलीसांनी शोध मोहीम राबवून पकडले आहे.
चारजे माळवाडी तसेच कोथरुड पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या काही गुन्ह्या सह मोक्का गुन्ह्यामधील WANTED पाहीजे असलेला आरोपी नामे अमोल दत्तात्रय लाखे, वय २७ वर्षे, रा. मु.पो. ईटखेडा, छ. संभाजीनगर हा गुन्हा केल्यापासून फरार होता. त्याचा गुन्हे शाखा, कोथरूड पोलीस स्टेशन तसेच वारजे माळवाडी पोलीस स्टेशनकडील कडील पोलीस शोध घेत होते परंतु तो त्याचे अस्तित्व लपवून राहत असल्यामुळे मिळून येत नव्हता.
दिनांक २५/०२/२०२६ रोजी वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना वारजे माळवाडी पोलीस ठाणेकडील मोक्का गुन्ह्यातील पाहीजे आरोपी अमोल दत्तात्रय लाखे हा बार्शी, जि. सोलापूर येथे असल्याची गोपनिय खबऱ्यामार्फत व तांत्रिक विश्लषणाद्वारे खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांना कळवून वरिष्ठांच्या परवानगीने तपास पथकाचे पोलीस अंमलदार अमित शेलार व सागर कुंभार यांचेसोबत आरोपीचे मागावर रवाना होवून त्यांनी दिनांक २६/०२/२०२६ रोजीचे पहाटे अमोल दत्तात्रय लाखे यास बार्शी, जि. सोलापूर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे आणून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, अजय परमार, यांचे सुचनेनुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी,पोलीस निरीक्षक (गुन्हे)प्रकाश धेंडे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अमित शेलार, सागर कुंभार, योगेश वाघ, शरद पोळ, निखील तांगडे, अमित जाधव, महादेव शिंदे, सत्यजित लोंढे यांनी केलेली आहे.
घायवळ टोळीतील मोकाचा फरार आरोपी अखेरीस पोलिसांच्या जाळ्यात
Date:

