लग्नानंतर तीन महिन्यांतच सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या: बाणेर परिसरातील घटना

Date:

पुणे-पुणे शहरातील बाणेर परिसरात हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरून एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत २७ वर्षीय गंगा तेजस बेंबळकर हिने राहत्या इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले. या प्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.

मृत तरुणीचे वडील शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती तेजस शिवा बेंबळकर, सासू उज्ज्वला शिवा बेंबळकर, सासरे शिवा माणिकराव बेंबळकर आणि नणंद रिया शिवा बेंबळकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी हे कर्नाटकातील कलबुर्गी येथील प्राध्यापक असून, त्यांनी मुलीच्या लग्नासाठी मोठा खर्च केल्याचे पोलिसांनी सांगितले.

फिर्यादीनुसार, साखरपुड्यापासूनच वादाला सुरुवात झाली होती. स्थळ पाहणीच्या वेळी वरपक्षाने कोणतीही मागणी नसल्याचे सांगितले होते. मात्र, साखरपुड्यावेळी वधूपक्षाने दिलेल्या आहेरावरून पाहुण्यांसमोर अपमान करण्यात आला. आहेर कमी प्रतीचा असल्याची टीका करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

वधूपित्याने मुलीच्या भविष्यासाठी स्वतःचा प्लॉट विकून महागडे मंगल कार्यालय बुक केले होते. विवाहासाठी मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची व्यवस्था केली असतानाही, वरपक्षाने कार्यक्रमस्थळ पसंत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. पाहुण्यांसाठी सोयी नसल्याचा मुद्दा उपस्थित करत अपमानास्पद वक्तव्ये करण्यात आली. लग्नाच्या दिवशीही किरकोळ कारणावरून वर उशिरा मंडपात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

विवाहानंतर काही दिवसांनी गंगा धार्मिक विधीसाठी माहेरी आली असता, सासरकडून हुंड्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे तिने वडिलांना सांगितले. माहेरून २१ तोळे सोने आणण्याची मागणी होत असल्याचा आरोप तिने केला होता. कुटुंबीयांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवले, मात्र त्यानंतर तिचा छळ आणखी वाढल्याचे समोर आले.

मृत तरुणीने मैत्रिणीशी फोनवर बोलताना सांगितले होते की, तिचा पती तिची अपमानास्पद तुलना करत असे, तिच्या शारीरिक स्वरूपावर टीका करत असे आणि शिक्षणाची खिल्ली उडवत असे. पतीने वैवाहिक आयुष्यातही दुरावा ठेवल्याचा आरोप आहे. तसेच, सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडूनही “लग्नातून काहीच मिळाले नाही” अशा टोमण्यांसह तिला सतत हिणवले जात होते.

५ फेब्रुवारी रोजी नातेवाईकांच्या कार्यक्रमात वडिलांना भेटताना गंगाने पुन्हा आपल्यावरील त्रासाबाबत सांगितले होते. कुटुंबीय पुढील महिन्यात तिला भेटण्याचा विचार करत असतानाच, १९ फेब्रुवारी रोजी तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घायवळ टोळीतील मोकाचा फरार आरोपी अखेरीस पोलिसांच्या जाळ्यात

पुणे-गुंड निलेश गायवळ टोळीतील चार महिन्यांपासून फरार असलेल्या दोन...

क्षेत्रीय कार्यालयांची रचना विशिष्ट राजकीय पक्षाच्या फायद्याची असल्याचा आरोप:आयुक्तांकडे लेखी तक्रार

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे महानगरपालिका आयुक्तांकडे क्षेत्रीय कार्यालये...