मुंबई भाजपच्या वतीने विविध उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा

Date:

मुंबई दिनांक २६ जानेवारी २०२४

मुंबई शहर उपनगरात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शुक्रवारी मुंबई भाजपाच्या वतीने विविध समाजोपयोगी, सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात कार्यक्रम घेण्यात आले.

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दादर पूर्व वसंत स्मृती, वांद्रे पश्चिम येथील बीपीई सोसायटी, पटवर्धन पार्क दांडा नाका खार, वांद्रे पूर्व पोलीस स्टेशन, आरोग्यधाम या ठिकाणी ध्वजारोहण केले. खा. गोपाळ शेट्टी यांनी कांदिवली पश्चिम महावीर नगर येथील पोईसर जिमखाना येथे ध्वजारोहण केले. खा. मनोज कोटक यांनी चंदननगर, सूर्यनगर, विक्रोळी पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन ध्वजवंदन केले. खा. पूनम महाजन यांनी कुर्ला पश्चिम विभागातील गाडगे महाराज हायस्कूल येथे परीक्षा पे चर्चा या उपक्रमात सहभाग घेऊन शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आ.कॅप्टन तमिळ सेलवन यांनी सायन कोळीवाडा येथे ध्वजारोहण केले. आ. पराग अळवणी यांनी विलेपार्ले परिसरात ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. आ. अमित साटम यांनी अंधेरी एस. व्ही. रोड येथील होम गार्ड कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. आ.भारती लवेकर यांनी वर्सोवा विधानसभेत विविध सामाजिक उपक्रम राबवून प्रजासत्ताक दिन साजरा केला. आ. विद्या ठाकूर यांनी गोरेगाव विधानसभा मतदार संघात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. कांदिवली पूर्व येथे विधानसभा मतदारसंघात आ. अतुल भातखळकर यांनी कार्यकर्ते आणि स्थानिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. आ. योगेश सागर यांनी चारकोप परिसरात उपस्थिती दर्शवून स्थानिकांसह प्रजासत्ताक दिन साजरा केला. आ. सुनील राणे यांनी शिंपोली पश्चिम येथील द व्हिलेज आर्ट अँड कल्चर सेंटर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. आ. प्रसाद लाड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सायन येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज डायलिसिस सेंटर येथे जाऊन रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. घाटकोपर विधानसभा क्षेत्रात आ. पराग शहा यांनी नायडू कॉलनी, पारसधाम सोसायटी येथे स्थानिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग घेतला. मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तजिंदर सिंग तिवाना यांनी मालाड येथील साई बाबा पार्क येथे ध्वजारोहण केले. मुंबई भाजपा बिहार प्रकोष्ठच्या वतीने मुंबई भाजपा कार्यालय ते भाजपा प्रदेश कार्यालय नरिमन पॉईंट या मार्गावर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली पार पडली. त्याचप्रमाणे मुंबई भाजपा विविध आघाडी, मोर्चा, सेलच्या वतीने सामाजिक सांस्कृतिक उपक्रम घेण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...