पुणे- महानगरपालिकेच्या विविध समित्यांवर अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाली. यामध्ये विधी समिती अध्यक्षपदी स्वरदा बापट उपाध्यक्ष पदी पायल तुपे, शहर सुधरणा समिती अध्यक्षपदी स्मिता वस्ते उपाध्यक्ष पदी सपना छाजेड, महिला बालकल्याण समिती अध्यक्षपदी सौ. अल्पना वरपे, उपाध्यक्ष पदी सौ. तन्वी दिवेकर, क्रीडा समिती अध्यक्षपदी नारायण गलांडे उपाध्यक्ष पदी दिनेश माथवड, शिक्षण समिती अध्यक्षपदी अरुण राजवाडे उपाध्यक्ष पदी अतुल तरवडे, नाव समिती अध्यक्षपदी पल्लवी जावळे उपाध्यक्ष पदी सुनील पांडे यांची निवड झाली.
याबद्दल सर्व नवनियुक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

