पुणे, दि. २७ फेब्रुवारी २०२६-नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी तसेच निवडीस नकार दिलेल्या, अपात्र व कागदपत्र पडताळणीस गैरहजर उमेदवारांची यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.igrmaharashtra.gov.in� वर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे.
अंतिम निवड यादीतील उमेदवारांचे समुपदेशन करून नियुक्ती देण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांनी दिनांक २ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील बहुउद्देशीय सभागृह (पाचवा मजला) येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाई (गट-ड) संवर्गातील २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर; २ मार्च रोजी समुपदेशन
Date:

