बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

Date:

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक

पिंपरी, : “पत्रकारांनी बदलत्या काळानुसार तंत्रस्नेही होणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे पत्रकारांच्या नोकऱ्यांसाठी धोका नसून त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि गती वाढवणारे प्रभावी साधन आहे. बातमीसाठी आवश्यक माहिती संकलन, विश्लेषण आणि संशोधन प्रक्रिया एआयमुळे अधिक वेगवान झाली आहे. मात्र, एआयचा वापर करताना संबंधित वाचकवर्ग लक्षात घेऊन योग्य प्रॉम्प्ट तयार करणे आणि प्राप्त माहितीची पडताळणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत पत्रकारांनी एआयचा प्रभावी वापर केल्यास त्यांची बातमी अधिक नेमकी, विश्वसनीय आणि वेगळी ठरू शकते,” असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व जनसंज्ञापन विभागाचे उपसंचालक प्रा. सुशोभन पाटणकर यांनी केले. मात्र एआय च्या माहितीवर पूर्णपणे विसंबून न राहता शहानिशा करूनच माहितीचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या विशेष उपस्थितीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. “पत्रकारिता क्षेत्रात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग” या विषयावर सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व जनसंज्ञापन विभागाचे उपसंचालक प्रा. सुशोभन पाटणकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

या व्याख्यानादरम्यान विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, विवेक इनामदार, अविनाश चिलेकर, विचारपीठावर उपस्थित होते.

प्रा. पाटणकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता क्षेत्र अधिक सक्षम व प्रगल्भ होणार असल्याचे नमूद केले. बातम्या अधिक माहितीपूर्ण व परिपूर्ण करण्यासाठी एआय उपयुक्त ठरत असून, या तंत्रज्ञानामुळे पत्रकारांच्या नोकऱ्यांवर धोका निर्माण झाला नसून त्यांच्या कामकाजात सुलभता निर्माण होत आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, एआयचा प्रभावी वापर करण्यासाठी त्यासंबंधित तंत्र आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या मार्गदर्शन सत्रामध्ये एआय म्हणजे काय, ते कसे कार्य करते, एआयचे विविध प्रकार, लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) यांची संकल्पना, तसेच प्रभावी प्रॉम्प्ट लिहिण्याची पद्धत याविषयी त्यांनी उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली.

एआय प्रणालींमध्ये डेटा सेंटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, बातमी तयार करण्यासाठी लागणारा वेळ या तंत्रज्ञानामुळे लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. बातमीसाठी आवश्यक माहिती संकलित करणे, तिचे विश्लेषण करणे आणि संशोधन करणे ही प्रक्रिया एआयच्या साहाय्याने अधिक वेगवान व सुलभ झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय, एआयकडून माहिती घेताना संबंधित बातमी कोणत्या वाचकवर्गासाठी आहे, हे निश्चित करून त्यानुसार प्रॉम्प्ट तयार करणे आवश्यक आहे. तसेच एआयद्वारे प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी करणे गरजेचे असून, त्यासाठी पत्रकारांचा अनुभव व सखोल वाचन उपयुक्त ठरते, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर म्हणाले, आज एआयमुळे बातमी लेखनासाठी आवश्यक संदर्भ, माहिती आणि पार्श्वभूमी सहज उपलब्ध होत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा नेमका आणि जबाबदारीने वापर कसा करावा, हे समजून घेण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात.
नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की,पत्रकारिता ही काळानुसार सातत्याने बदलत आलेली आहे. हाताने पाने जुळवण्यापासून ते संगणकाधारित संपादनापर्यंत आपण अनेक तांत्रिक टप्पे अनुभवले आहेत. विज्ञानाच्या प्रगतीसोबत पत्रकारितेतही बदल अपरिहार्य ठरले आहेत. आजच्या डिजिटल युगात एआयचा वापर हा बदलत्या काळाची गरज बनला आहे. अशा पार्श्वभूमीवर एआयविषयी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम आयोजित करणे ही स्वागतार्ह बाब आहे. आज विज्ञानाच्या प्रगतीनुसार पत्रकारांचे कष्ट कमी झाले आहेत. मेल व्हाट्सअप, फेसबुक लाईव्ह, कार्यक्रमांचे व्हिडिओ यामुळे प्रत्येक ठिकाणी जाण्याची गरज राहिली नाही. मात्र आळसावलेल्या पत्रकारांसाठी एआय तंत्रज्ञान मोठे आव्हान आहे. नवीन काही देण्याचा प्रयत्न न केल्यास व कॉपी-पेस्ट पत्रकारिता केल्यास नोकरीवर गदा येऊ शकते याचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे
सातुर्डेकर म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. प्रसार माध्यमांमध्ये विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाचे असते. ही विश्वासार्हता तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फूट घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात.. प्रशासनाचा...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...

प्रदूषणाने कॅन्सर; महाराष्ट्र सरकारची कबुली, 57% रुग्णांचे फुफ्फुस ‘आजारी’, राज्य सरकारच्या अभ्यासात मोठा खुलासा

बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची...