मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फूट घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

Date:

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात.. प्रशासनाचा अहवाल मागविणार की धडाकेबाज निर्णय घेणार ?

पुणे- गेल्या 10 वर्षा पेक्षा अधिक काळापासून मुंबई महापालिका 500 चोरस फुटापर्यंत च्या घरांना मिळकत कर माफी देऊन त्यांच्याकडून कोणत्याही स्वरूपाचा कर आकरत नाही.या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रशासकीय काळाच्या अगोदरील सत्रात देखील कॉँग्रेस ने सत्ताधारी भाजपकडे पुण्यातही 500 चौरस फुट घराला मिळकत कर माफी द्यावी असा आग्रह धरला होता.

आता आज होणाऱ्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत कॉँग्रेसचे गटनेते चंदू शेठ कदम यांनी हा प्रस्ताव दिला आहे. पहा नेमके के म्हटले आहे या प्रस्तावात जसेच्या तसे..

पुणे महानगरपालिका हद्दीतील निवासी मिळकत धारकांकडून मिळकत कर घेण्यात येतो. ५०० चौ. फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकत कर माफ करण्याबाबत नागरिकांकडून मागणी होत आहे.पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ पाहता भविष्यात निवासी,बिगर निवासी,मोबाईल टोवर अशा मिळकतीमधून करोडोंचा महसूल मनपास मिळणार आहे. तसेच पुणे शहरात कर आकारणी न केलेल्या हजारो मिळकती असून अशा मिळकतीना कर आकारणी करणे आवश्यक आहे.
५०० चौ. फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकती या गोरगरीब नागरिकांच्या असतात, सध्याची महागाई व बेरोजगारी लक्षात घेता नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५०० चौ. फुट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या मिळकतींचा मिळकत कर माफ करण्यात यावा.

आता यावर स्थायी समिति अध्यक्ष श्रीनाथ भिमाले मुळातच कित्येक वर्षांपासून या विषयाला अनुकूल असल्याचे दिसून आलेले आहे. त्यांची ही अशी मिळकत कर माफी देण्याची ई छ्या वेळोवेळी दिसून आलेली आहे. मात्र महापालिकेच्या तिजोरीचा भार सांभाळताना आशा प्रस्तावावर नेहमी प्रशासनाचा अहवाल घेण्यात येतो. आणि तो आर्थिक दृष्ट्या महापालिकेला किती पेलवणार की ना ही ? याबाबतचा विचार करून प्रस्ताव संमत केले जातात किंवा तसेच प्रलंबित ठेवले जातात.पण हा प्रस्ताव संमत झाला तर तो ऐतिहासिक ठरेल आणि भिमाले यांच्या कारकीर्दीतील प्रस्ताव म्हणून स्मरणीय ठरेल.आता भिमाले हे व्यावहारिकेतून मार्ग काढून यावर नेमका के निर्णय घेणार ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक पिंपरी,...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...

प्रदूषणाने कॅन्सर; महाराष्ट्र सरकारची कबुली, 57% रुग्णांचे फुफ्फुस ‘आजारी’, राज्य सरकारच्या अभ्यासात मोठा खुलासा

बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची...