येरवडा कारागृहात प्रजासत्ताक दिन साजरा

Date:

पुणे-२६ जानेवारी २०२४ रोजीचा प्रजासत्ताक दिन कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर उपमहानिरीक्षक, स्वाती साठे, यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात अमिताभ गुप्ता यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तसेच २६ जानेवारी २०२४ करीताचे कारागृह विभागातील ०९ अधिकारी / कर्मचारी यांना सन्मानीय राष्ट्रपतीचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये तुरुंगाधिकारी श्रेणी १ श्री रुकमाजी नरोड, तुरुंगाधिकारी श्रेणी-१ श्री सुनिल पाटील, सुभेदार श्री बळीराम पाटील, सुभेदार श्री सतिश गुंगे, हवालदार सुर्यकांत पाटील, हवालदार श्री नामदेव भोसले, हवालदार श्री संतोष जगदाळे, हवालदार श्री नवनाथ भोसले, हवालदार श्री विठ्ठल उगले यांना सन्मा. राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाल्याबाबत त्यांचा अमिताभ गुप्ता व डॉ. जालिंदर सुपेकर हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सन २०२४ मध्ये गुणवत्तापुर्ण सेवेकरिता संपुर्ण भारतातून महाराष्ट्र कारागृह विभागास सर्वाधिक ०९ राष्ट्रपती पदक मिळविण्याचा बहुमान प्राप्त झालेला आहे.
सदर कार्यक्रमास कारागृह अधीक्षक सुनिल ढमाळ, उपअधीक्षक, बी. एन. ढोले, उपअधीक्षक पल्लवी कदम, उपअधीक्षक श्री रविंद्र गायकवाड, उपअधीक्षक मंगेश जगताप, आनंदा कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, तसेच येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कारागृह मुख्यालयाकडील स्विय सहायक कैलास शेटे, आनंदा कांबळे व इतर कक्ष अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...