गुलटेकडीत अल्पवयीन मुलांनी रेग्युलर खंडणीसाठी केला हवेत गोळीबार, म्हणाले, आम्हीच इथले भाई …

Date:

पुणे: गुलटेकडी परिसरात अल्पवयीन मुलांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करत दहशत माजवल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात २० फेब्रुवारी रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास चार अल्पवयीन दुचाकीवरून आले. त्यांनी नागरिकांना ‘आम्ही या भागातील भाई आहोत, येथे आमचीच चालणार. या भागात राहायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल,’ असे धमकावले.

यावेळी त्यांनी त्यांच्याकडील पिस्तूल उगारून दहशत निर्माण केली. नागरिकांना शिवीगाळ करत त्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला आणि शस्त्राचा धाक दाखवला. या घटनेनंतर अल्पवयीन मुले दुचाकीवरून पसार झाली.

गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आणि पसार झालेल्या चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजप कार्यालयासमोर फुले उधळून राहुल गांधींना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा केला निषेध

दादर येथे भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन मुंबई युवक...

आमदारांकडून विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी अभ्यास दौरा मार्गदर्शक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचा वेल्स अभ्यास दौरा यशस्वी; सहभागी सदस्यांना...

पीएम ‘कॉम्प्रमाईज’ असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसचे आंदोलन

अनेक पदाधिकारी डिटेन पुणे, दि. २१ फेब्रुवारी : AI Summit दरम्यान...

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...