प्रसिद्ध कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते यांच्या दिनदर्शिकेचे मोती बागेत प्रकाशन

Date:

पुणे : संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समिती आणि नंदकिशोर कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य कार्यालय, मोती बाग येथे संपन्न झाला. पद्मविभूषण पं बिरजू महाराजजी ह्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ह्या दिनदर्शिकेचे हे चौथे वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दिनदर्शिका काढली जाते. या वेळी विविध घराण्यातील नामवंत गुरू व भारतातील पुरुष कथक नर्तक हा विषय घेऊन दिनदर्शिका काढण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असल्यामुळे मोती बागेतच या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्याची इच्छा होती असे विचार संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर कपोते ह्यांनी आपल्या भाषणात मांडले. प्रमुख अतिथी प्रांत कार्यवाह डाॅ.प्रविण धबडगाव ह्यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन करुन डाॅ. नंदकिशोर कपोते ह्यांचे अभिनंदन केले. डाॅ. धबडगाव आपल्या भाषणात म्हणाले ” अनेक वर्षांच्या खडतर प्रवासातून निरंतर नृत्य कलेची सेवा करुन शास्त्रीय नृत्यास प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम डाॅ. कपोते यांनी केले. त्यांच्या अनेक शिष्यांनी कथक नृत्य कलेत प्राविण्य मिळविले आहे, सर्व नृत्य कलाकारांनी संग्रही ठेवावी अशी ही दिनदर्शिका आहे “. यावेळी प्रांताचे अखिल भारतीय दृश्य कला सहसंयोजक सतीश कुलकर्णी, महामंत्री प्रशांत कुलकर्णी, पश्चिम प्रांताचे संपर्क मंत्री मिलींद भोळे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिना आढाव ह्यांनी केले.
या प्रसंगी उपाध्यक्ष प्रफुल्ल भिष्णूरकर, सचिव लीना आढाव, संपर्क प्रमुख गणेश आढावमंचिय कला संयोजक भावना सामंत, छायाचित्र समन्वक नरेंद्र घोडकेप्रसार व प्रसिध्दी समन्वयक अनुष्का सामंत उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे - आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित...

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...

शेतकरी,बेरोजगार, महिला, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार: रमेश चेन्नीथला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या, विपरित...