कात्रजजवळ अपघाताचा थरार!:5 वाहनांना उडवून डंपर जळून खाक, भीषण अपघातात 4-5 प्रवासी गंभीर जखमी

Date:

पुणे-सातारा महामार्गावरील जांभुळवाडी बोगद्याजवळ डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून, या अनियंत्रित डंपरने समोरील चार ते पाच वाहनांना अक्षरशः उडवल्याने मोठी खळबळ उडाली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की अपघातानंतर अवघ्या काही क्षणातच डंपरने पेट घेतला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यातील 4 ते 5 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले आहे.

जांभूळवाडी बोगदा, नवले ब्रिज आणि वडगाव ब्रिज हा पट्टा आता अपघातांचे भीषण केंद्र बनला असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे. काही दिवसांपूर्वीच नवले ब्रिजवर झालेल्या कंटेनर-कारच्या भीषण धडकेत 7 जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाही, रोजच्या वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. आज झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :...