हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

Date:

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त विधानचे पडसाद आता उमटण्यास सुरू झाले आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान केले होते. यावर आता मराठा ठोक मोर्चा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. मराठा ठोक मोर्चाचे सोलापूर येथील समन्वयक महेश डोंगरे यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे.

सोलापूर येथील मराठा ठोक मोर्चाने हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलया आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळेच कॉंग्रेस संपली. त्यांच्या तोंडाला जो कोणी काळे फासेल त्याला एक लाखांचे बक्षीस देणार. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांना मराठा समाज रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा देखील महेश डोंगरे यांनी इशारा दिला आहे.

काय आहे प्रकरण?

मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. त्यानंतर तो फोटो हटवण्यात देखील आता. मात्र, याच वादानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा येथे बोलताना वादग्रस्त विधान केले. टिपू सुलतान यांना देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान त्यांनी केले. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याच प्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले, असे सपकाळ म्हणाले होते.

माझ्या वक्तव्याची मोडतोड- हर्षवर्धन सपकाळ

दरम्यान, वादग्रस्त विधान केल्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर ट्विट करत म्हटले की, माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध’ चा ‘मा’ करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केलया आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...

गुडलक चौक परिसरातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतर निर्णयाचा पुनर्विचार व्हावा – नगरसेवक हर्षवर्धन मानकर

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी...