पुणे जिल्ह्यासाठी शाश्वत विकास निर्देशांक आराखड्यासाठीचे ३% निधीबाबत सादरीकरण आणि अधीवेशनात पुनश्च बैठकीबाबत नीलम गोऱ्हेंनी सुनेत्रा पवारांना दिले निवेदन

Date:

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आणि SDG २०३० राबविण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पीय अधिवेशनात बैठक घेण्याची केली सूचना

पुणे.दि.१२: आज पुणे विभागीय कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. याबैठकीत पुणे जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेत शाश्वत विकास ध्येये (SDG २०३०) साध्य करण्यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यात विशेष तरतुदी करण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सादर केले आहे.

या निवेदनात ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा निर्देशक आराखडा तयार करून प्रगती मापन अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच रस्ते सुरक्षा, मेट्रो विस्तार, आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी, आरोग्य व्यवस्था आणि मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी विशेष निधी आणि उपाययोजनांची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

याशिवाय पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आणि SDG २०३० राबविण्याच्या दृष्टीने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व जिल्हयातील सर्व आमदार यांची मुंबईत विशेष बैठक घेण्यात यावी, अशी सूचना देखील डॉ. गोऱ्हे यांनी केली.

बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी दलितवस्ती सुधारणा निधी अखर्चित राहिल्याचे नमूद करून महसूल विभागाकडून सर्व निर्णयांची माहिती सादर करण्याची मागणी केली. विशेष गहन पुनरीक्षण (SIR) मोहीम व जातिनिहाय जनगणना कशा पद्धतीने होणार याची कार्यप्रणाली जाहीर करावी.

SDG साठी ३ टक्के निधी जिल्हा नियोजन मधून खर्च करण्यात येत असतो तो कोणत्या योजनांसाठी व कोणत्या घटकांसाठी खर्च केला आहे त्याचे सादरीकरण करण्याची डॉ.गोऱ्हे यांनी सूचना केली.

महिला सक्षमीकरणासाठी अधिक तरतुदी कराव्यात अशा इतर सूचनाही त्यांनी मांडल्या. केंद्र सरकारच्या ‘सखी’ (वन स्टॉप सेंटर) योजनेच्या केंद्रांना भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठक सुरू होण्यापूर्वी सभागृहात विविध मान्यवरांनी दिवंगत नेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी अजितदादा कामकाजात अत्यंत दक्ष असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रेझेंटेशनवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. दादांच्या स्मारकासाठी जिल्हा नियोजनमध्ये तरतुद करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दादांच्या अचानक निधनाने तीव्र दुःख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजपा नगरसेवकांकडून कलाकार कट्टा काढून टाकण्याचा प्रस्ताव -राष्ट्रवादीचा विरोध

पुण्यातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतराच्या प्रस्तावाचा तीव्र निषेध पुणे- शहरातील गुडलक...

जुन्नर येथे सय्यद वाड्यात रुग्ण हक्क परिषदेच्या शाखेचे उद्घाटन….

पुणे: रुग्णांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वसामान्य...

पुन्हा एकदा पुणे महापालिका हद्दवाढीचा तोच निर्णय …

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश-“विशेष नियोजन प्राधिकरण”...

केंद्रीय मंत्र्यांनी पुनरुच्चार केला- लैंगिक गुन्हेगार एपस्टीनला भेटले होते, एपस्टीनला उत्तर देताना म्हटले होते – ‘हॅव फन’.

जेफ्री एपस्टीन न्यूयॉर्कचा अब्जाधीश फायनान्सर होता. त्याची मोठ्या नेत्यांशी...