172 कोटी रुपयांचे बनावट जीएसटी क्रेडिट फसवणूक रॅकेट उघडकीस

Date:

मुंबई-

सीजीएसटी (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालयाच्या  करचोरी विरोधी शाखेने अंदाजे 952 कोटी रुपयांच्या वस्तू आणि सुमारे 172 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) शी संबंधित एक मोठी बनावट जीएसटी क्रेडिट फसवणूक उघडकीस आणली आहे.

कागदपत्रे आणि तपासाच्या आधारे, मेसर्स फ्लोरिडा सॉल्व्हेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक  भौमिक गिरीशभाई गांधी (GSTIN: 27AAFCF0626D1Z2) याने मालाची  प्रत्यक्ष पावती किंवा पुरवठा न करता अपात्र आयटीसी मिळवणे  आणि ते दुसऱ्याला देणे या प्रकारामुळे गांधी हा  या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले.

मेसर्स फ्लोरिडा सॉल्व्हेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या पुरवठादारांवर अधिकारक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी अनेकदा छापे घातले , ज्यामध्ये कंपनी अस्तित्वात नसल्याचे किंवा रद्द झाल्याचे उघड झाले, जे बनावट व्यवहार दर्शवते. भौमिक गिरीशभाई गांधी याच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यांमध्ये  फसव्या व्यवहारांची  पुष्टी करणारे गुन्हेगारी पुरावे सापडले.

चौकशीदरम्यान, गांधी याने सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 70 अंतर्गत स्वेच्छेने दिलेल्या निवेदनात फसवणुकीचा सूत्रधार, कमिशन मिळवणे आणि बेकायदेशीर रकमेचा थेट फायदा घेण्यातली  आपली भूमिका कबूल केली. 10 फेब्रुवारी 2026 रोजी त्याला अटक करण्यात आली, न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

सीजीएसटी ठाणे आयुक्तालयाने कर फसवणुकीविरुद्ध आपली कडक भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे आणि जीएसटी  चुकवण्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सोलापूर आणि कोल्हापूर दरम्यान नियमित इंटरसिटी ट्रेन सेवा

मुंबई- सध्या सोलापूर-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) विभागातील प्रवाशांच्या गरजा...

राज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यात

‘मास्मा रिन्यूएबल एनर्जी एक्स्पो’ १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान पुणे, ...

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील उद्याच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा.

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी २०२६ केंद्रातील भाजपा सरकारने कामगार कायद्यात...