पीएमआरडीएचा अनधिकृत बांधकामांना दणका; सेक्टर ९, ११ सह भोरमधील होर्डिंग्जवर फिरवला बुलडोझर!

Date:

  • ४ हजार चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त; अडीच एकर वाहनतळाची जागा मोकळी!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मंगळवारी (दि. १०) अनधिकृत बांधकामांविरुद्ध धडक मोहीम राबवत, कारवाईचा बडगा उगारला. प्राधिकरणाच्या सेक्टर ९ आणि ११ मधील पत्राशेड्स, गॅरेजेस तसेच भोर तालुक्यातील अनधिकृत होर्डिंग्जवर ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४ हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले असून, अडीच एकर शासकीय जागा मोकळी करण्यात आली आहे.

दि. १० फेब्रुवारी रोजी सेक्टर ९ मधील पत्राशेड, तसेच सेक्टर ११ मधील ४५ मीटर रस्त्यालगत असलेल्या गॅरेज आणि लेबर कॅम्पवर (कोठी) कारवाई करण्यात आली. वाहनतळासाठी आरक्षित जागेवर उभारलेली बेकायदेशीर पत्राशेड हटवून २.५ एकर क्षेत्र मोकळे करण्यात आले. या परिसरातील इतर टपरीचालक व वाहनतळधारकांना जागा तातडीने खाली करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
तसेच, भोर तालुक्यातील शिंदेवाडी येथेही ‘पीएमआरडीए’च्या पथकाने कारवाई केली. येथील श्री. पानसरे (गट क्र. ६०) यांची दोन होर्डिंग्ज, तसेच श्री. शिंदे (गट क्र. ६२, संस्कृती ॲडव्हर्टायझिंग) यांच्या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. इतर बेकायदेशीर होर्डिंग्ज हटवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
सदर कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आय़ुक्त दीपक सिंगला, आणि दक्षता विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपायुक्त आशा होळकर, तहसीलदार रवींद्र रांजणे यांच्यासह नियोजन सहाय्यक व अभियंत्यांच्या पथकाचा सहभाग होता.

परवानगी घेऊनच बांधकामे करा!
“परिसरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे. नागरिकांनी आणि बांधकामधारकांनी पीएमआरडीएची रीतसर परवानगी घेऊनच बांधकामे करावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.” —

– डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, सहआयुक्त, पीएमआरडीए
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका देऊ शकत नसेल तेव्हा, ३२ गावातील नवीन प्रकल्पांना मुबलक पाणी देण्याची जबाबदारी बिल्डरचीच-अनिरुद्ध पावसकर

पुणे-समाविष्ट ३२ गावातील नवीन प्रकल्पांना मुबलक पाणी देण्याची जबाबदारी...

शेतजमिनींचे रूपांतर बिगरशेती जमिनीत होणे अन्नसुरक्षेसाठी गंभीर

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून शून्य प्रहरात मुद्दा उपस्थित;...

कामगार कर्मचारी संघाची नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घोषणा मुंबई -अखिल...