नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकरांचा आदर्श निर्णय,नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग

Date:

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. २५ (ब) मधून नवनिर्वाचित झालेले भाजपाचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी एक आदर्श निर्णय जाहीर केला आहे. नगरसेवक म्हणून मिळणारे मासिक मानधन आणि इतर सर्व प्रकारचे भत्ते स्वीकारण्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला असून, ही मानधनाची रक्कम ‘महापौर निधी’ला वर्ग करण्याबाबतचे पत्र देत, शहरातील गरजू रुग्णांच्या मदतीसाठी खर्च करण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १९ (अ) १ अंतर्गत निर्वाचित सभासदांना मिळणारे मानधन आपण स्वीकारणार नसल्याचे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. या मानधनाची रक्कम दरमहा ‘महापौर निधी’ मध्ये जमा करण्यात यावे आणि त्यातून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे.

आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले की, “राजकारण हे माझ्यासाठी समाजसेवेचे माध्यम आहे. नगरसेवक पद हे या सेवेसाठी ताकद देणारे पद आहे. प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याचे मानधन घेणे मला पटत नाही. त्यांनी दिलेल्या या संधीच्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून येणारे मानधन हे त्यांच्या सेवेसाठी खर्च व्हावे या भावनेतून मी हा निर्णय घेतला. अनेकदा गरीब रुग्णांना औषधोपचारासाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. माझ्या मानधनाचा विनियोग अशा रुग्णांच्या सेवेसाठी झाल्यास त्याचे मला अधिक समाधान मिळेल.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर

पन्नास हजार हरकती आलेला डीपी रद्द करावा - भाऊसाहेब...

तेलंगणा मधील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा पुण्यात निषेध

माळी महासंघ पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन ;...

अजितदादा पवार यांच्या स्मृती पुणे महापालिकेत कायम उजळत राहणार

सभागृह नेते गणेश बिडकरांकडून स्वर्गीय अजितदादा पवार यांचे तैलचित्र...