महाराणी ताराराणी यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय शालेय वक्तृत्त्व स्पर्धा संपन्न

Date:

पुणे ; सरहद पुणे, येथे महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षां निमित्त राज्यस्तरीय शालेय वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. या करिता राज्यातील ३५ शाळेतील ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. वक्तृत्व स्पर्धेचे विषय हे ताराराणी यांच्या जीवनावर आधारित होते.स्पर्धेकरिता भाषेचं बंधन नसल्याने स्पर्धेला खऱ्या अर्थानं राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी नगरसेविका वर्षाताई तापकीर , संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर अनुज नहार सर, मुख्याध्यापिका सौ.सुजाता गोळे, सौ.गीता खोत, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक मयूर मसुरकर, संस्थेचे सर्व विभाग प्रमुख तर परीक्षक म्हणून लाभलेले तिन्ही इतिहास अभ्यासक, लेखक व कवी सचिन खोपडे, गोपाळ कांबळे, सौ. रश्मी वानखडे हे यावेळी उपस्थित होते. तसेच पुढे परीक्षक म्हणून तिघांनी काम पाहिले.संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला

५ वी ते ७ वी गटातून
प्रथम क्रमांक – गुंजन राऊत
ज्ञानेश प्राथमिक शाळा,
द्वितीय क्रमांक – ईश्वरी शिवतरे , महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कन्या शाळा, वाई
तृतीय क्रमांक– श्रावणी तावरे कान्होजी जेधे विद्यालय, कारी तालुका
हिने पटकावला तसेच

उत्तेजनार्थ पारितोषिक
स्पर्श कालवणकर- ब्लॉसम पब्लिक स्कूल नऱ्हे , अवनि उल्हाळकर – सरहद स्कूल कात्रज, श्लोक विश्वासराव- पी.इ.एस मॉडेल इंग्लिश हायस्कूल शिवाजी यांनी पटकविले.

8वी ते 10वी गटातून
प्रथम क्रमांक– वक्रतुंड कारले, सरहद ग्लोबल स्कूल गुजरवाडी

द्वितीय क्रमांक– अनुष्का बाबर, सुंदराबाई मराठे विद्यालय
तृतीय क्रमांक– अलफिया पठाण सिग्नेट पब्लिक स्कूल नऱ्हे यांना मिळाला.

उत्तेजनार्थ पारितोषिक अंकिता जाधव- चाटे पब्लिक स्कूल, सान्वी मुंदडा- पोदार इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव, आराध्या गर्जे- सरहद पब्लिक स्कूल धनकवडी. या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल बोंद्रे, देविका भोसले यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मयूर मसूरकर यांनी केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सृष्टी ढोरे यांनी केले.

.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बनावट आधारकार्डद्वारे बोगस मतदान, 6 जणांवर गुन्हा:तिघांचे झाले मतदान, तर तिघांच्या तपासणीत फुटले बिंग

पुणे-पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध...

डॉ. चेतना पाठक, पद्मश्री पंडित मधुप मुद्‌गल यांचे भावस्पर्शी गायन

पुणे : लयबद्ध, भावपूर्ण रितीने साकारलेले डॉ. चेतना पाठक...