बनावट आधारकार्डद्वारे बोगस मतदान, 6 जणांवर गुन्हा:तिघांचे झाले मतदान, तर तिघांच्या तपासणीत फुटले बिंग

Date:

पुणे-पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील केसनंद भागातील एका मतदान केंद्रावर ही घटना घडली असून, त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी मोहम्मद एहसान नजर (वय २०), अर्षद रोशन अली (वय २२), अखिलेश बिजूकुमार प्रसाद (वय २०), दिलीप सक्रु चव्हाण (वय ३६), प्रेमदास रामचंद्र राठोड (वय ३०) आणि अश्विनी प्रेमदास राठोड (वय २७) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार बाळासाहेब हराळ यांनी वाघोली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे मतदान शनिवारी (७ फेब्रुवारी) पार पडले. केसनंद भागातील श्री जोगेश्वरी विद्यालयाच्या आवारातील मतदान केंद्रात तीन आरोपींनी मतदान केले. त्यानंतर, मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी इतर तीन जणांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आले. पोलिसांनी तात्काळ सहाही जणांना ताब्यात घेतले.

गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी बांधकाम मजूर असून, ते सध्या केसनंद भागातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहतात. यातील तीन आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत, तर उर्वरित तीन वाशीम जिल्ह्यातील आहेत. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. चेतना पाठक, पद्मश्री पंडित मधुप मुद्‌गल यांचे भावस्पर्शी गायन

पुणे : लयबद्ध, भावपूर्ण रितीने साकारलेले डॉ. चेतना पाठक...