पुणे महापालिकेच्या बांधकाम मंजुरीचे बोगस कागदपत्रे सादर करून दस्तनोंदणी जोरात सुरु ..बड्या रॅकेटकडे बडे दुर्लक्ष

Date:

पुणे : पुणे महापालिकेच्या बांधकाम मंजुरीचे बोगस कागदपत्रे सादर करून पुण्यात दस्तनोंदणी जोरात सुरु असून महापालिका आणि PMRDA च्या हद्दीतसुरु असलेल्या बड्या रॅकेटकडे बडे दुर्लक्ष वारंवार होत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे कात्रज भागात बेकायदा बांधकामांचे दस्त नोंदणी झाल्याचे आरोप नुकतेच वसंत मोरे यांनी केले होते. पण बेकायदा बांधकामाच्या दस्त नोंदणीच्या महापुराने पुण्याचे वाट्टोळे सुरु ठेवलेले असताना जिल्हाधिकारी कार्यालयाचे मात्र यावर डोळे उघडत नसल्याचे आजवर दिसून आले आहे. दरम्यान असेच एक प्रकरण वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.

बनावट कमेन्समेंट प्रमाणपत्र, कम्प्लिशन प्रमाणपत्र आणि मंजूर बांधकाम आराखड्यांच्या आधारे दस्त नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वामीराज डेव्हलपर्सचे भागीदार संदिप दामोदर कडू (वय ३८, रा. विठ्ठल नगर सोसायटी, आनंदनगर, वडगाव धायरी), साईनाथ वासुदेव सपकाळ (वय ३७, रा. तृप्ती गार्डन, आनंदनगर, सिंहगड रोड), महेश महाबळेश्वर नाईक (वय २५), रा. विठ्ठल नगर सोसायटी, आनंदनगर, वडगाव धायरी), आश्रफ खलील शेख (वय २५, रा. हर्ष पॅलेस, आनंदनगर, सिंहगड रोड), संदेश राजू आवळे (वय ३४), प्रियंका संदेश आवळे (वय २९, रा. स्वामीराज बी, वडगाव धायरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर भारतीय न्याय संहितेतील कलम ३३६(३), ३४०(२), ३१८(४), ३(५) तसेच नोंदणी अधिनियम कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सह दुय्यम निबंधक हवेली क्र. १३, पुणे शहर कार्यालयाचे अधिकारी व्ही. डी. कासेवाड (वय ५३) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० डिसेंबर २०२४ रोजी घडला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दस्त क्र. २३७८१/२०२४ नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करताना फिर्यादी कासेवाड यांना जोडलेल्या पूरक कागदपत्रांबाबत संशय आला. संबंधित दस्तासोबत पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे कमेन्समेंट प्रमाणपत्र व मंजूर बांधकाम आराखडा जोडण्यात आला होता.

या कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी ती पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग (झोन क्र. २) यांच्याकडे पाठविण्यात आली. १७ फेब्रुवारी २०२५ रोजी उपअभियंता कार्यालयाकडून त्यांना पत्र प्राप्त झाले.

या पत्रानुसार, धायरी येथील सर्व्हे नं. १०५, हिस्सा ५/१ या ठिकाणी नमूद बांधकामास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यानंतर सादर केलेली कमेन्समेंट प्रमाणपत्रे, कम्प्लिशन प्रमाणपत्रे व मंजूर आराखडे बनावट असल्याची खात्री झाली. संबंधित आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शिरोळे करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. चेतना पाठक, पद्मश्री पंडित मधुप मुद्‌गल यांचे भावस्पर्शी गायन

पुणे : लयबद्ध, भावपूर्ण रितीने साकारलेले डॉ. चेतना पाठक...

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील २०१–बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त...

बिल्डर सुशील रहेजासाठी पोलिस तत्पर; वंचितच्या महिला पदाधिकाऱ्यांना अटक!

मुंबई : एकीकडे अट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी...