​’एक्सप्रेशन्स २०२६​’​चे  उत्साहात   उद्घाटन 

Date:

पुणे​:

भारती विद्यापीठ ​इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप पुणे यांच्या वतीने आयोजित ​’एक्सप्रेशन्स २०२६ ​’या तीन दिवसीय वार्षिक सांस्कृतिक व सर्जनशील महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ​

या उद्घाटन सोहळ्यास डिव्हाईन मिस अर्थ इंडिया २०२५ कोमल चौधरी या प्रमुख पाहुण्या  म्हणून उपस्थित होत्या. तसेच ​’कल्ला​कार फॅक्टरी​’चे सीईओ आणि कॉन्सेप्च्युअलायझर  पंकज सातव  मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित ​होते.

भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट (IMED) चे संचालक डॉ. श्रवण कडवेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि सत्कार केला. ​यावेळी येस बँकेचे सरदार खान, प्रमोद चतुर्वेदी, मंगेश भोसले यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. येस बँक, टीव्हीएस, इकोकारी , मॅफिन्स यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

डॉ प्रवीण माने, डॉ स्वाती देसाई, स्वप्नील थोरात, डॉ हेमा मिर्जी, दिप्ती देशमुख , डॉ.सुचेता कांची यांनी महोत्सवाचे संयोजन केले.

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी अशा सांस्कृतिक व्यासपीठांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ​

एक्सप्रेशन्स २०२६ या महोत्सवात सुमारे ५० महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला असून ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी १८  सांस्कृतिक, कलात्मक आणि सर्जनशील स्पर्धांमध्ये भाग घेतला . अडीच लाखाहून अधिक किमतीची रोख पारितोषिक तसेच प्रमाणपत्रे देण्यात आली.

 कला, फॅशन, सादरीकरण आणि नवकल्पना यांसारख्या विविध क्षेत्रांतील युवा प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक देवाणघेवाणीस प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

उद्घाटन सोहळ्यानंतर महोत्सवातील विविध स्पर्धा आणि उपक्रमांची औपचारिक सुरुवात झाली असून पुढील दिवसांसाठी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. एक्सप्रेशन्स हा भारती विद्यापीठ, पुणे येथे आयोजित होणारा एक महत्त्वाचा आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव म्हणून आपली ओळख अधिक दृढ करत असल्याचे​ डॉ.श्रवण कडवेकर यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका

व्यापार–उद्योगासाठी अनुकूल धोरणांचा सूर; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे "न्याय...

‘हॉटेल स्वराज्य आणि बार’वर आढळल्या ईव्हीएम मशीन

जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी संपत असतानाच मोहोळ शहराजवळील 'हॉटेल...

दीपक पायगुडे, लता राजगुरू यांचा रमाईरत्न पुरस्काराने गौरव

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संतसाहित्याविषयी आस्था होती....

महिंद्राचा महाराष्ट्रात एकात्मिक ऑटो आणि ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प:15,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा.

नागपूर येथील प्लांटमध्ये 2028 पासून उत्पादनास सुरुवात नागपूर,: महाराष्ट्रातील नागपूर येथे ऑटोमोबाईल्स...