राजेश बनकर यांच्याकडे आता रस्त्यांचे नेटवर्क: सुसज्ज रस्ते व सुयोग्य पदपथासाठी आता मार्गदर्शक तत्वे, शहर परिवर्तन समिती

Date:

पुणे- महापालिका हद्दीतील रस्ते , पदपथ यांचे संपूर्ण नेटवर्क आता राजेश बनकर यांच्या अधिपत्याखाली असणार आहे आणि आता पुणेकरांना सुसज्ज रस्ते व सुयोग्य पदपथ उपलब्ध व्हावीत या साठी आता मार्गदर्शक तत्वे आखण्यात येत आहे आणि ‘‘ शहर परिवर्तन समिती ’’देखील स्थापित करण्याच्या हालचाली सुरु जाल्या आहेत.

अतिरिक्त महापालिका आयुक्त ( वि ) यांनी काल पथ विभागाकडील अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. सदर आढावा बैठकीत शहरात सुसरू असलेल्या खड्डेमुक्त अभियान, चेंबर्स समपातळीत करणे व पदपथांची देखभाल दुरूस्ती या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.यात काय ठरले ते वाचा …..
• नागरिकांना सुसज्ज रस्ते व सुयोग्य पदपथ उपलब्ध व्हावेत यासाठी मार्गदर्शक तत्वे ( एस.पी.ओ. ) तयार करण्यात आली असून त्यानुसारच रस्ते व पदपथ यांची उभारणी करण्यात यावी.
• शैक्षणिक संस्था, हॉस्पीटल , रेल्वे, मेट्रो स्टेशन्स यासारख्या सार्वजनिक व जास्त गर्दीच्या ठिकाणी प्राधान्याने पदपथ उपलब्ध करून देणे तसेच पदपथ दुरूस्तीची कामे हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
• शहरातील जास्तीत जास्त चेंबर्स पुढील तीन महिन्यात समपातळीत आणणेसाठी अतिरिक्त टीम करून गुणवत्तापूर्वक काम करून घ्यावे. किमान ५० चेंबर्स रोज पूर्ण करण्याचे उदिदष्ट ठेवावे.
• आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी ज्या दर्जाच्या रस्त्यांची उभारणी करण्यात आलेली आहे त्याच दर्जाच्या रस्त्यांची उभारणी यापुढील काळात करण्यात यावी.त्यासाठी पू.ग.प. , अटी, शर्ती सुधारीत कराव्या.
• पथ विभागाकडील अभियंता यांचेसाठी दर तीन महिन्यांनी रस्ते क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, आय.आय.टी. सारख्या संस्था यांचेकडून रस्ते बांधणी क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, तांत्रिक कौशल्य माहिती होणेसाठी प्रशिक्षण आयोजत करण्यात यावे.
• सेवावाहिन्यांसाठी विविध कंपन्याकडून वारंवार खोदाई करण्यात येते व त्यामुळे रस्ते खराब होतात या अनुषंगाने पुढील काळात केलेल्या खोदाईची पुर्नबांधणी मुख्य पथ विभागामार्फत एस.पी.ओ. नुसार करण्यात यावी. त्यासाठी अंदाजपत्रकीय तरतूदीबाबत प्रस्ताव सादर करावा.
• ‘‘ शहर परिवर्तन समिती ’’ स्थापन करण्याचे नियोजन असून या समितीमार्फत विविध प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी शहरातील विविध विभागांची समन्वय बैठक आयोजित करण्यात येणार असून कामात सुसूत्रता येवून कामे जलद गतीने होणेस मदत होणार आहे.त्यासाठी मनपा कडील विविध प्रलंबित विषयांची तपशीलवार माहिती बैठकीत सादर करावी.
• बैठकीचे शेवटी पथ विभागाकडे मुख्य अभियंता पदावर रूजू झालेले श्री. राजेश बनकर यांचे अभिनंदन करण्यात येवून गुणवत्तापूर्वक कामे करण्यासाठी त्यांचा अनुभव उपयोगी होईल त्यादृष्टीने कामकाज टीम म्हणून करावे.
• सदर बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त ( वि ) श्री. ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता (पथ )- श्री. राजेश बनकर ,अधिक्षक अभियंता ( पथ ) – श्री. आशित जाधव, अजित बांबळे, अभिजीत आंबेकर तसेच पथ विभागाकडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...