लक्ष्मीनाराण चौक,मोदी प्लाझा मधील प्रतिक मेहताच्या हुक्का पार्लरवर छापा-फायरब्रिगेडकडून शटर तोडून आतला उध्वस्त केला बाजार …

Date:

पुणे- स्वारगेट जवळील लक्ष्मीनारायण चौकातील मोदी प्लाझा मध्ये असलेल्या एलडिनेरो हॉटेलमधील अवैधरित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा मारून हॉटेलचा आणि हुक्का पार्लर चा मालक प्रतिक विकास मेहता याच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रतिक मेहता हा धनकवडी चव्हाण नगर येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी असेही सांगितले कि,’स्वारगेट पो.स्टे. दि.३०.०१.२०२६ रोजी हद्दीत लक्ष्मीनाराण चौक येथील मोदी प्लाझा बिल्डीग मधील एलडिनेरो हॉटेल मध्ये अवैधरित्या हुक्का चालु असलेबाबत खबर प्राप्त होताच स्वारगेट पो.स्टे. कडील पोलीस निरीक्षक विकास भारमळ, महिला फौजदार सुजाता जाधव, तपास पथकातील पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार टोणपे, कुडाळकर, ठोंबरे, मार्शल जाधव व साळवे यांनी प्राप्त माहितीचे ठिकाणी छापा टाकण्यासाठी मोदी प्लाझा बिल्डीग, तिसरा मजला वरील एलडिनेरो हॉटेल येथे गेले असता सदर हॉटेलचे शटर आतून बंद होते. शटर उघडण्यासाठी वारंवार आवाज देवून देखील हॉटेलचे आतमधून कोणताही प्रतिसाद न आल्याने फायरब्रिगेड जनता अग्नीशमन केंद्र जनता वसाहत पर्वती पुणे ०९ यांना घटनास्थळी बोलावून त्यांचे स्टाफ व पोलीस स्टाफ यांचे मदतीने मोदी प्लाझा एलडिनेरो हॉटेलच्या शटरचे लॉक तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला असता आतमध्ये बेकायदेशीररित्या ग्राहकांकडुन रोख रक्कम घेवुन तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर ओढण्याकरिता कामगाराकरवी आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास धोकादायक/अपायकारक असा अवैधरित्या हुक्का, सेवना करिता हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना विक्री करताना मिळुन आले. तसेच विविध हुक्का पॉट, चिलीम, वेगवेगळे प्रतिबंधीत तंबाखूजन्य फ्लेवर व अन्य साहित्य मिळून आले. सदर बाबत हॉटेल मॅनेजर सनी सुंदर परिहार, वय-३३ वर्षे, रा. गुलटेकडी स्वारगेट पुणे. याचेकडे विचारणा करता त्याने हॉटेलचे मालक प्रतिक विकास मेहता, रा. चव्हाणनगर, धनकवडी, पुणे यांचे सांगणेवरुन हॉटेलमधील वेटर यांचेकरवी, हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना हुक्का सेवन करण्यासाठी देत असल्याचे सांगितले.
सदर बाबत एलडिनेरो हॉटेल, मोदी प्लाझा, स्वारगेट याचे मालक प्रतिक विकास मेहता, हॉटेल मॅनेजर सनी सुंदर परिहार व हॉटेलमधील वेटर दिपक सतभूषण जैन, मोसिन दिलमोहम्मद शेख, अनमोल सरवन श्रेष्ठ, पर्वत सुरज परिहार, ढोल बहादुर परिहार यांचेवर स्वारगेट पो.स्टे. गु.रजि.नं. २०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३ सह सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम- २०१८ चे कलम ४-अ, २१- अ, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून एकूण रु. २२,५६०/-चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र बनसोडे, पोलीस उप-आयुक्त साो, परि. २ पुणे शहर मिलींद मोहिते, मा. सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर धन्यकुमार गोडसे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक गुन्हे विकास भारमळ, महिला पोलीस उप निरीक्षक सुजाता जाधव, व पोलीस अंमलदार टोणपे, कुडाळकर, ठोबरे, जाधव, साळवे यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८ व्‍या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्यावतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण.

पुणे-स्व. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८ व्‍या पुण्यतिथी निमित्त...

नऱ्हेगाव येथील वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ३०: सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण...

“पुण्याच्या राजकीय व सामाजिक सुसंस्कृत संवादाचा दुवा हरपला” – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : पुण्याचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नेते शांतीलाल...