पुणे- वाहतूक कोंडी निवारणासाठी नगरसेवक स्वप्नील दुधाने रस्त्यावर उतरले आहेत त्याच बरोबर श्रमिक वसाहत या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे येथे प्रत्यक्ष ठिकाणी भेट देत नागरिकांना यावर कार्यवाही करण्याचा शब्द दिला होता.तिथे प्रत्यक्ष उभे राहून त्यांनी तेथील स्वच्छता , सुधारणा ,आदींची कामे सुरु करवून घेतली आहे . निवडून आल्यावर नगरसेवक भेटत नाही हि संकल्पना मोडून काढून त्यांनी कामास प्रारंभ करत पुन्हा जनतेशी आपली नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरु ठेवल्याचे यातून दिसते आहे . ते म्हणाले,’नुकतीच महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपली असून अधिकारी वर्गाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आज या अनुषंगाने प्रत्यक्ष ठिकाणी भेट दिली आणि कामाच्या दर्जाबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा केली. यावेळी नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांच्या सूचनांचे स्वागत केले आणि सर्व शौचालये अत्याधुनिक व अद्ययावत करण्यासंबंधी शब्द दिला. लवकरच ही सर्व कामे मार्गी लागतील, यात शंकाच नाही.आपल्या प्रभागातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सतत वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सतावत आहे. या अनुषंगाने आज प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता गोजारे , पथ विभागाचे उपअभियंता भूतडा आणि सर्व कर्मचारी यांच्यासह प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
सदर चौकातून मुख्य एनडीए रोडलगत मेट्रो होणार असून याकरिता वाहतूक कोंडी निवारीत करण्यासाठी प्रयत्न करणे, आवश्यक आहे. याबाबत मुख्य रस्त्याचे मोजमाप घेण्यात आले आणि अधिकारी वर्गाशी उड्डाणपूल करण्यासंबंधी चर्चा केली. यावेळी अधिकारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून प्रकल्प विभागाकडून असे अनेक उपक्रम आकारास आल्याने त्यांच्या अनुभवाचा वापर करत हे कार्य त्यांच्याचतर्फे घडून येवो, अशी विनंती केली.यावेळी प्राथमिकत: विनंती स्वीकारली असून वाहतूक कोंडी निवारीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. याचमुळे भविष्यात सदर प्रश्न पूर्णतः मार्गी लागेल आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास वाटतो.असेही दुधाने यांनी म्हटले आहे.

