नेस वाडिया कॉलेज, सीओईपी टेक आणि निकमारचे दमदार विजय

Date:

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या राष्ट्रीय स्तरावरील विश्वनाथ स्पोर्ट्स मीट (व्हीएसएम–२०२६) अंतर्गत रविवारी व सोमवारी खेळविण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांत नेस वाडिया कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) आणि निकमार संघांनी प्रभावी विजय नोंदवत आपली ताकद दाखवून दिली. उरुळीकांचन येथील निकम मैदान व एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या मैदानावर हे सामने रंगले.

निकम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नेस वाडिया कॉलेजने आयटीएम इलेव्हनवर ५२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत नेस वाडियाने सलामीवीरांच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर १६ षटकांत ३ बाद १७० धावांचा मजबूत डाव उभारला. वेदांत डेडगेने संयमी खेळ करत ४७ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या, तर प्रणव लोखंडेने अवघ्या २१ चेंडूत ४९ धावांची स्फोटक खेळी साकारली. प्रत्युत्तरात आयटीएम इलेव्हनचा डाव नेस वाडियाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर गडगडला. रोहन देसाईने भेदक मारा करत ३ बळी टिपले, तर कर्णधार अश्विन शिंदेने महत्त्वाचे बळी घेत विजय निश्चित केला.

त्याच मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात सीओईपी टेक संघाने एमआयटी– वर्ल्ड पीस विद्यापीठवर (डब्ल्यूपीयू) ९ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत एमआयटी–डब्ल्यूपीयूने १७ षटकांत ८ बाद १४६ धावा केल्या. मात्र, आदित्य इंदानीच्या अचूक गोलंदाजीमुळे (४/२२) डावाला मर्यादा आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सीओईपी टेकचा सलामीवीर मल्हारने अप्रतिम खेळी साकारत ५३ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या. त्याला अमेय दांडेकरची ४९ धावांची भक्कम साथ लाभली आणि संघाने सहज विजय मिळवला.

दरम्यान, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात निकमार संघाने एमआयटी स्कुल ऑफ कंम्पुटींगवर (एसओसी) ९ गडी राखून वर्चस्वपूर्ण विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत एमआयटी एसओसीला १८.२ षटकांत अवघ्या १०३ धावांपर्यंत मजल मारता आली. निकमारकडून गौरव ठाकूरने ३ बळी घेत गोलंदाजीचे नेतृत्व केले. प्रत्युत्तरात, कर्णधार ओम अशोक कोकणेने आक्रमक फलंदाजी करत केवळ २७ चेंडूत नाबाद ५६ धावा ठोकल्या. रुतुराज तावरेनेही ४२ धावांची उपयुक्त खेळी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.


संक्षिप्त धावफलक :

नेस वाडिया कॉलेज – १६ षटकांत १७०/३ (वेदांत डेडगे* ६४ – ४७ चेंडू, प्रणव लोखंडे ४९ – २१ चेंडू, साकिब खान ३१ – २५ चेंडू; विकास सी २/२४) वि.वि. आयटीएम इलेव्हन – १६ षटकांत ११८/९ (सिद्धांत सातपुते ४७ – ३८ चेंडू, सक्षम सुखीजा २७ – १० चेंडू; रोहन देसाई ३/१६, अश्विन शिंदे २/१४)  सामनावीर: वेदांत डेडगे


एमआयटी–डब्ल्यूपीयू – १७ षटकांत १४६/८ (रोहन मोहिते ३६ – २२ चेंडू, अफनान पंडित २९ – १६ चेंडू; आदित्य इंदानी ४/२२) पराभूत.वि.सीओईपी टेक – १६.३ षटकांत १४८/१ (मल्हार* ७० – ५३ चेंडू, अमेय दांडेकर ४९ – ३७ चेंडू) सामनावीर : आदित्य इंदानी


एमआयटी एसओसी – १८.२ षटकांत १०३/१० (श्रेयश पारवे ३१ – २७ चेंडू; गौरव ठाकूर ३/२२, सुश्रुत भैस्वर २/१४, वेदांत गिदये २ बळी) पराभूत.वि. निकमार – ८.३ षटकांत १०५/१ (ओम अशोक कोकणे* ५६ – २७ चेंडू, रुतुराज तावरे ४२ – २२ चेंडू) सामनावीर: ओम कोकणे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी सर्वच समाजाची फसवणूक करून फडणवीसांनी राज्यात जातीय संघर्ष पेटवला

ओबीसी बहुजन पक्ष व काँग्रेसची आघाडी, जिल्हा परिषद, पंचायत...

अमेरिकेच्या धमकीनंतर 7 देशांचे सैनिक ग्रीनलँडमध्ये पोहोचले

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या धमक्यांनंतर...

शिवजयंतीच्या पूर्व तयारी साठी महापालिका भवनात झाली कार्यकर्त्यांची बैठक संपन्न: थेट आयुक्तांशी साधला संवाद

पुणे- शिवजयंतीच्या पूर्व तयारी साठी महापालिका भवनात आज कार्यकर्त्यांची...