स्पेनमधील कॉर्डोबा प्रांतात रविवारी रात्री एक ट्रेन रुळावरून घसरून दुसऱ्या ट्रेनला धडकली. या अपघातात मृतांची संख्या २१ झाली आहे. ७३ प्रवासी जखमी झाले आहेत. एपीनुसार, दोन्ही ट्रेनमध्ये सुमारे ५०० प्रवासी होते.अहवालानुसार, मलागा येथून माद्रिदला जाणारी ट्रेन रुळावरून घसरून जवळच्या लाईनवर गेली आणि तेथे माद्रिद–हुएलवा मार्गावर धावणाऱ्या AVE ट्रेनला धडकली.
स्थानिक आरोग्य मंत्री अँटोनियो सँज यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना भीती आहे की मृतांची संख्या आणखी वाढू शकते. ते म्हणाले की, मदत आणि बचाव कार्य सतत सुरू आहे आणि जखमींना सहा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

