जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे पारा सतत उणे तापमानात आहे. रविवारी सोनमर्ग खोऱ्याचे तापमान -8.9°C, श्रीनगरचे -4.7°C, शोपियानचे -6.7°C आणि पहलगाममध्ये -6°C होते.

हिमाचल प्रदेशातील उंच पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाली. हमीरपूरमध्ये तापमान 2.1°C, ऊनामध्ये 2.7°C आणि मंडीमध्ये 3.9°C होते. याशिवाय, पंजाबमधील अमृतसरचे तापमान 1.7°C होते.
उत्तर भारतातील मैदानी राज्यांमध्ये पंजाब, दिल्ली, राजस्थान, चंदीगड, हरियाणा, उत्तर प्रदेशात थंडीचा प्रभाव आहे. या भागांमध्ये दाट धुके पसरले आहे. पंजाबमधील हलवारा येथे सकाळपासून दृश्यमानता शून्य आहे.
तर, उत्तर प्रदेशात अचानक हवामान बदलले आहे. लखनऊ-बाराबंकीसह अनेक शहरांमध्ये सोमवारी सकाळी पाऊस झाला. अलिगढमध्ये गारपीट झाली आहे.

