पुणे, — टेनेको क्लीन एअर इंडियाने जाट रेजिमेंटच्या 15व्या बटालियन आणि वाघ्मी फाउंडेशन यांच्या सहकार्याने आज पुण्यातील लुल्लानगर येथील जाट रेजिमेंटच्या आवारात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण उपक्रम राबवून वृक्षारोपण अभियान सुरू केले. या कार्यक्रमांतर्गत 5,000 रोपांची लागवड करण्यात येणार असून दीर्घकाळ पर्यंत ती झाडे नीट रुजतील हे सुनिश्चित करण्यासाठी 18 महिन्यांपर्यंत त्यांची देखभाल केली जाणार आहे.
या उपक्रमाला टेनेकोचे नेतृत्व, जाट रेजिमेंटच्या 15व्या बटालियनचे अधिकारी व जवान तसेच वाघ्मी फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि समुदाय भागीदारीप्रती टेनेकोची सातत्यपूर्ण बांधिलकी मजबूत होते.
या उपक्रमाबाबत बोलताना टेनेको इंडियाचे अध्यक्ष ऋषी वर्मा म्हणाले, “वृक्षारोपण अभियान हा भारताच्या पर्यावरणीय प्राधान्यांमध्ये योगदान देण्याच्या टेनेकोच्या व्यापक उद्दिष्टातील एक अर्थपूर्ण टप्पा आहे. संरचित देखभाल, संरक्षण आणि वैज्ञानिक निरीक्षणाच्या माध्यमातून दीर्घकालीन हरित आवरण विकसित करण्यावर आमचा भर आहे. या सहकार्यात्मक प्रयत्नांद्वारे समाजाला पुढील अनेक वर्षे लाभ होईल अशी अधिक निरोगी आणि सक्षम परिसंस्था निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाला वाघ्मी फाउंडेशनकडून टॅग लावण्यात येईल आणि त्याची नोंद ठेवण्यात येईल. त्यामुळे त्यांचे पद्धतशीर निरीक्षण, रोपं सुस्थितीत असल्याचा मागोवा आणि त्रैमासिक अहवाल सादर करणे शक्य होईल. पर्यावरणाप्रती दीर्घकालीन सहभाग आणि जबाबदारी अधिक दृढ करत टेनेको आणि फाउंडेशनचे कर्मचारी नियमित पुनर्भेटींच्या माध्यमातून या उपक्रमात सातत्याने सहभागी राहतील.
टेनेको क्लीन एअर इंडिया लिमिटेडने भारताच्या ऑटोमोटिव्ह परिसंस्थेत प्रगत अभियांत्रिकी, मजबूत उत्पादन क्षमता यांसह देशव्यापी स्थान मिळविले आहे. जागतिक टेनेको ग्रुपचा भाग म्हणून ही कंपनी सुरक्षितता, कार्यक्षमता आणि जबाबदार कार्यपद्धतींवर ठाम भर देत ओईएमना उच्च दर्जाच्या क्लीन एअर, पॉवरट्रेन आणि सस्पेन्शन प्रणालींचा पुरवठा करते.

