पुणे ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

Date:

पुणे,
पुणे शहरात १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ च्या पार्श्वभूमीवर, सोमवार दि. १९ जानेवारी २०२६ रोजी शहरातील प्रमुख भागांतील शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत.
या स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ सोमवार, १९ जानेवारी रोजी पुणे शहरात होणार असून, त्यानिमित्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोड (एफ.सी. रोड), गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता (जे.एम. रोड) तसेच या मार्गांना जोडणारे उपरस्ते यांचा समावेश आहे. रस्ते बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार, पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड, विश्रामबागवाडा-कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, सिंहगड रोड तसेच वारजे-कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच व्यावसायिक शिक्षण संस्था सोमवार, १९ जानेवारी रोजी बंद राहतील.
हा सुट्टीचा आदेश केवळ सोमवार, १९ जानेवारी २०२६ या एका दिवसापुरताच लागू राहणार असून, मंगळवार दि. २० जानेवारीपासून सर्व शैक्षणिक संस्था नियमित वेळेनुसार सुरू राहतील. नागरिकांनी व पालकांनी वाहतूक व्यवस्थेतील बदल लक्षात घेऊन आपले नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सीडब्ल्यूजी व ऑलिंपिक मध्ये भारत नंबर १वर असेल-केंद्रीय रक्षा राज्य मंत्री संजय सेठ

एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागाच्या द्रोणाचार्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे उद्घाटन पुणे,...

पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे रविवारी लोकार्पण

पुणे, दि. ७ – पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक...

महिला दिनी भेट: घरगुती सिलिंडरचे दर 60 रुपयांनी वाढले

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर 60 रुपयांनी महाग केले...

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुस्लिम समाजातील महिलांसाठी रोजा इफ्तार पार्टी

पुणे- आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भवानी पेठ येथील काशिवाडी...