कोल्हापूर :
सकाळची कोवळी सोनेरी किरणे.. मैफिलीचे गुंजणारे स्वर आणि सुर… कॅनवासवर पसरणारे रंग…. मातीतून घडणारे शिल्प.. मंत्रमुग्ध करणाऱ्या या वातावरणाने टाऊन हॉल गार्डन बहरून गेले. निमित्त होते रंगबहार संस्थेच्या वतीने. रंगलेल्या ‘मैफल रंगसुराची’चे.
कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर स्मृती सोहळ्यात ज्येष्ठ चित्रकार श्रीकांत जाधव यांना श्यामकांत जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रंगबहारच्या मैफिलीचे हे ४९ वे वर्ष आहे.
स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य अजेय दळवी यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. अभिजित कांबळे यांनी करून दिली. सत्कारमूर्तिचा परिचय आणि मानपत्र वाचन प्राचार्य मनोज दरेकर यांनी केले.
आभार चित्रकार शिल्पकार संजीव संकपाळ यांनी मानले. सूत्रसंचालन नागेश हंकारे यांनी केले.
या मैफलीत ओंकार पाटील हे शास्त्रीय गायन सादर करतील. त्यांना मयुरेश मधुसूदन शिखरे (तबलावादक) यांची साथ लाभणार आहे, तर चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर (बेळगाव), अभिजित पाटील (सांगली), किरण हणमशेट (बेळगाव), श्रुती रुग्गे (इचलकरंजी), अथर्व सावंत (कोल्हापूर), आदित्य सुतार (बेळगाव) यांनी व्यक्तीचीत्र रेखाटली.
प्रमोद देडगे (सावर्डे), आशेर फिलीप (कोल्हापूर),सचिन बन्ने (मुंबई) यांनी निसर्ग चित्रण केले. श्रद्धा चराटकर (कोल्हापूर) यांनी कोलाजमध्ये चित्रे साकारली. तेजस पाटील (कोल्हापूर) यांनी कॅलिग्राफी प्रात्यक्षिक सादर केले. दीक्षा देसाई (कोल्हापूर), साॅलीया इनामदार (इचलकरंजी) यांनी रचना चित्र प्रात्यक्षिक साणार केली. शिल्पकार ओमकार मसूरकर (सावंतवाडी), प्रज्वल गोंधळी (सावर्डे), रोहन कुंभार (सांगली) यांनी व्यक्तीशिल्प प्रात्यक्षिक सादर केली .
यावेळी विजय टिपूगडे, संजय शेलार, विलास बकरे, सागर बगाडे, प्रा. प्रवीण वाघमारे, सर्वेश देवरुखकर, प्रा. शैलेश राऊत, अतुल डाके, प्रा. किशोर राठोड, जावेद मुल्ला, राहुल रेपे, अनुप संकपाळ, बबन माने, विजय उपाध्ये, सागर बकरे, आरिफ तांबोळी, प्रा. मनिपद्म हर्षवर्धन, प्रा. अभिजित कांबळे, संतोष पोवार, प्रा. गजेंद्र वाघमारे, सुदर्शन वंडकर आदी उपास्थित होते.
टाऊन हॉलमध्ये रंगली ‘मैफल रंगसुरांची…’श्रीकांत जाधव यांना रंगबहार जीवन गौरव पुरस्कार
Date:

