पुणे- कसबा -मंडई या प्रभाग २५ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. बाप्पू म्हणजेच राघवेंद्र मानकर, स्वरदा गौरव बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडीत अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत. पुण्यातील प्रभाग २५ मध्ये भाजपच्या यंग ब्रिगेडनं बाजी मारली आहे.कुणाल टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्र मानकर, स्वप्नाली पंडित यांचा विजय झाला आहे.मुक्ता टिळक यांचा मुलगा तर गिरीश बापट यांची सूनेनं विजयाचा गुलाल उधळला..तर वडगावशेरीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपच्या उमेदवार ऐश्वर्या पठारे यांनी विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक 39 मध्ये भाजप तीन राष्ट्रवादी एक असा विजय मिळाला आहे भाजपच्या वर्षा साठे,रुपाली धावडे,बाळा ओसवाल हे विजयी झालेत तर दर निवडणुकीला पराभूत होणारे दिगंबर डवरी याही वेळी पराभूत झालेत त्यांना राष्ट्रवादीचे प्रतीक प्रकाश कदम यांनी धूळ चारली .याच पॅनल मध्ये बापू नायर यांचा मात्र पराभव झाला.
महापालिका निवडणुकीत प्रभाग पद्धतीमुळे एका प्रभागात चार सदस्य निवडले जातात. त्यामुळे मतदार एका पक्षालाच चारही मते देईल, अशी अपेक्षा सर्वच पक्षांना असते. मात्र यावेळी अनेक प्रभागांमध्ये मतदारांनी वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना मते दिल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील थेट लढतीत मतदारांनी स्थानिक उमेदवार, त्यांची प्रतिमा, कामाचा अनुभव आणि व्यक्तिगत संपर्क यांना अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट पीएमपी आणि मेट्रो प्रवास मोफत केला जाईल, अशा घोषणा केल्यामुळे भाजच्या तोंडचे पाणी पळाले होते. खिशात नाही दाणा आणि बाजीराव म्हणा, काहीही आश्वासने देतात, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर केली होती. तर याला उत्तर देत मी बाजीरावच, पहिला बाजीराव कर्तबगार होता, तिजोरीत आणा आणणार असे सांगून पलटवार पवारांनी केल होता. एकूण भाजपला एकहाती आणि सोपी वाटणारी निवडणूक अजित पवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्यामुळे कठीण वळणाची ठरली

