नवी दिल्ली, 23 जानेवारी 2024
नामिबियातून आणलेल्या मादी चित्ता ज्वालाने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. केंद्रीय, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव, यांनी आज ही माहिती दिली आहे.
नामिबियातून आणलेल्या आशा या आणखी एका मादी चित्ताने, काही दिवसांपूर्वीच तीन बछड्यांना जन्म दिल्यानंतर, तीनच आठवड्यांनी ही शुभ वार्ता आली आहे. या आनंदाच्या बातमीबद्दल, भूपेंद्र यादव यांनी वनाधिकाऱ्यांचे आणि वन्यजीव प्रेमींचे अभिनंदन केले आहे.