पुणे- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे म्हटले होते त्यांच्या विश्वासानुसार आणि अभ्यासानुसार पुण्यात भाजपचे मिशन वेगाने सफल होताना दिसत असून या मिशन मध्ये विरोधी पक्षांतील बडे बडे नेते पराभूत होताना दिसत आहेत आता पर्यंत भाजपच्या विरोधात कित्येक वर्षे आक्रमक पणे लढलेल्या नेत्यांचा यात समावेश आहे. कॉंग्रेसचे अविनाश बागवे आणि त्यांची पत्नी इंदिरा बागवे हे पराभूत झाले आहेत. अवघ्या ५०/६० मतांनी अविनाश बागवे यांचा पराभव झाला आहे.त्यांचा पराभव करणाऱ्या विवेक महादेव यादव यांना 12423 मते मिळाली विशेष म्हणजे त्यांच्या पॅनेलमधील रफिक शेख 14049 एवढी मते घेऊन विजयी झालेत आणि इंदिरा बागवेही पराभूत झाल्यात.मृणाल बापू कांबळे यांना 14093 मते मिळाली इंदिरा बागवे यांचा त्यांनी अवघ्या २०० मतांनी पराभव केला . अर्चना पाटील भाजपच्या येथून विजयी झाल्यात . भाजपच्या संदीप लडकत यांचा देखील ५०/६० मतांनी कॉंग्रेसच्या रफिक शेख यांनी पराभव केल्याने या निकालाकडे महत्वपूर्ण म्हनून पाहिले जात आहे.
प्रभाग ३६ मध्ये म्हणजे सहकारनगर पद्मावती येथे भाजपचे चारही उमेदवार निवडून आले आहेत येथून अजितदादा गटाचे दिग्गज समजले जाणारे सुभाष जगताप तर पराभूत झालेच पण एकनाथ शिंदे गटाला मिळालेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल देखील पराभूत झालेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांचाही पराभव झाल्याने या निकालाकडे विशेष महत्वाने पहिले जाते आहे. येथून भाजपच्या महेश वाबळे 18104,सई प्रशांत थोपटे20797,भोसले शैलजा अरुण 21715,वीणा गणेश घोष21430 मते मिळालीत .
आबा बागुल यांनी येथील निवडणूक निकालानंतर आपली प्रतिक्रिया आठवणीने पाठविली आहे.
कामं हरली,पैसा जिंकला: आबा बागुल पुणे महानगरपालिका निवडणुकीतील निकाल हे अनपेक्षित असून आजवर केलेली विकासकामे हरली आणि पैसा जिंकला असेच म्हणावे लागेल अशा शब्दात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी खंत व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर – पद्मावतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी धक्कादायक पराभवानंतर बोलताना म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून काल मतदान होईपर्यंत सर्वत्र गोंधळ, तणाव,पैशाचा खेळ आणि सत्तेचा गैरवापर पाहायला मिळाला. सुज्ञ मतदार कुठेतरी या प्रकारांना आळा घालतील असा विश्वास होता.पण शेवटी पैसाच मोठा झाला.मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. वॉर्ड असो प्रभाग रचनाही बदलून मी निवडून आलो ते केवळ विकासकामांच्या जोरावर ;पण यंदा सातव्यांदा निवडणुकीला सामोरे गेलो मात्र जो पराभव पत्करावा लागला तोच मुळात अनपेक्षित तर आहे. शिवाय सत्ताधारी कोणतेही षडयंत्र रचू शकतात यावरच शिक्कामोर्तब झाले आहे. सत्तेचा गैरवापर, यंत्रणांना हाताशी धरून मोठ्याप्रमाणावर पैशाचा पाऊस पाडून विकासाला बगल देण्याची खेळी यशस्वी झाली हे लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे.वास्तविक मी ज्यावेळी अपक्ष म्हणून पहिली निवडणूक जिंकली,त्यानंतर मी सातत्याने विकासकामांवर भर दिला. मात्र यंदा जो पराभव झाला आहे,तो अनपेक्षित असल्याचे नमूद करताना आबा बागुल यांनी विकासकामांवर विश्वास ठेवून मला ज्या सुज्ञ मतदारांनी मतदान केले त्यांचे आभारही त्यांनी मानले आहेत.
पुणेकरांनी टाकलेला हा विश्वास – मुरलीधर मोहोळ
तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे .
प्रभाग क्रमांक 08
भाजपचे चारही उमेदवार विजयी…..
08अ – परशुराम वाडेकर – भाजप
08ब – अजित गायकवाड – भाजप
08क – सपना छाजेड – भाजप
08ड – सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण – भाजप
प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
किरण दगडेपाटील, दिपाली पवार, अल्पनाताई वरपे, दिलीप वेडेपाटील
प्रभाग क्रमांक 37
- भाजपचे प्रभाग क्रमांक 37 चे सर्व पॅनल विजयी
- किशोर धनकवडे
- वर्षा तापकीर,
- अरुण राजवाडे
- तेजश्री बदक विजयी
- आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत पराभूत

